शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

भाजपाने काय छळ केला ते गुलाबरावांनी जाहीर करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2017 22:59 IST

नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत शिवसेनेची राज्यात चौथ्या क्रमांकापर्यंत पिछेहाट झाली आहे. हा पराभव जिव्हारी लागल्याने पैसा, जातीचे राजकारण असे आरोप भाजपावर करण्यात येत आहे

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 27 : नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत शिवसेनेची राज्यात चौथ्या क्रमांकापर्यंत पिछेहाट झाली आहे. हा पराभव जिव्हारी लागल्याने पैसा, जातीचे राजकारण असे आरोप भाजपावर करण्यात येत आहे. भाजपाने शिवसेनेला काय छळले हे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जाहीर करावे, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जिल्हा बँक, जिल्हा दूध संघात असलेल्या युतीबाबत सेनेनेच निर्णय घ्यावा, असे ही ते म्हणाले.  यावेळी माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर, जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील उपस्थित होते.

काय छळ केला ते गुलाबरावांनी सांगावेसहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने केला नाही तितका छळ भाजपाने केला असल्याचे म्हटले होते, याबाबत महाजन यांना विचारले असता ‘भाजपाने काय छळ केला ते त्यांनी सांगावे’ असे ते म्हणाले. पालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेची चौथ्या क्रमांकावर पिछेहाट झाल्याने पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. त्यामुळे त्यांच्याकडून आरोप होणे स्वाभाविक आहे.

जिल्हातंर्गत युतीचा निर्णय सेनेने घ्यावायुती तोडल्यानंतर शिवसेनेच्या सत्तेतील सहभागाबाबत विचारले असता हा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. यावर भाष्य करण्या इतका मोठा नेता मी नाही असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सहकारी संस्थांमध्ये असलेली युती ही यापूर्वी झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात युती ठेवायची किंवा नाही याचा निर्णय शिवसेनेने घ्यावा असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील युती सध्या कायमउद्धव ठाकरे यांनी यापुढे युती न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जिल्ह्यात जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये अनेक दिवसांपूर्वीची युती आहे. त्यामुळे जिल्हातंर्गत युतीमध्ये काही बदल होईल असे वाटत नाही.