शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

गाढवांच्या बाजारातही गुजरातचा बोलबाला!

By admin | Updated: March 17, 2017 03:20 IST

‘व्हायब्रंट गुजरात’चा नारा देऊन देशात बोलबाला निर्माण केलेला गुजरात पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे भरणाऱ्या सुप्रसिद्ध गाढवांच्या बाजारातही आघाडीवर आहे.

साहेबराव नरसाळे, अहमदनगर‘व्हायब्रंट गुजरात’चा नारा देऊन देशात बोलबाला निर्माण केलेला गुजरात पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे भरणाऱ्या सुप्रसिद्ध गाढवांच्या बाजारातही आघाडीवर आहे. राज्यातील गावरान गाढवांबरोबरच उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील गाढवं येथे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली आहेत. विशेष म्हणजे, गेल्या चार दिवसांत या गुजराती गाढवांनाच चांगली मागणी झाली आहे. त्यांच्या किंमती १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.मानाची होळी पेटल्यानंतर मढी यात्रौत्सवास सुरुवात होते़ सुमारे १५ दिवस हा यात्रौत्सव चालतो़ उद्या शुक्रवारी पंचमीच्या दिवशी मुख्य यात्रौत्सव भरत आहे़ त्यानिमित्त मढी देवस्थानच्या पायथ्याला गाढवांचा बाजार भरला आहे़ हा बाजारही सुमारे आठवडाभर चालतो़ गाढवांच्या गावरान (महाराष्ट्रीयन) आणि काटोडिया (गुजरात) अशा दोन प्रमुख जाती आहेत़ कटोडिया जातीतीलच सुमारे ३०० गाढवं गुजरातमधून दाखल झाली आहेत़ गेल्या चार दिवसांत दीडशे गाढवांची हातोहात विक्री झाली आहे़ किमान पाच हजारापासून ते २५ हजारांपर्यंत किमती आहेत. लहान गाढवाची किंमत ५ हजार रुपयांपासून सुरु होते. घारे डोळे असलेल्या गाढव मादीची सर्वाधिक २५ हजार रुपये किंमत काढण्यात आली आहे़ जंगली गाढवाची किंमत २० हजार रुपये असून जिराफासारखे दिसणारे हे गाढव बाजारातील एकमेव असून, ते दुर्मीळ असल्यामुळे त्याचा भाव जास्त असल्याचे विक्रेते म्हणाले.‘सैराट’चा प्रभावबाजारात एका मालकाने आपल्या गाढव जोडीचे नाव परश्या व आर्ची असे ठेवले आहे़ आर्ची गाढवाचे डोळे घारे असून, परश्या जंगली प्रकारातील असल्याचे रमेश जाधव, संतोष माने यांनी सांगितले़