शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून गुजराती समाजाने नाकारले शिवसेनेला

By admin | Updated: February 24, 2017 09:32 IST

मुंबई महापालिका निवडणुकीत लालबाग, परळ, वरळी, प्रभादेवी, दादर, माहिम या मराठी पट्ट्यात शिवसेनेने खणखणीत यश मिळवले.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 24 - मुंबई महापालिका निवडणुकीत लालबाग, परळ, वरळी, प्रभादेवी, दादर, माहिम या मराठी पट्ट्यात शिवसेनेने खणखणीत यश मिळवले. पण अमराठी विशेषकरुन गुजराती मतदारांचा विश्वास मात्र सेनेला जिंकता आला नाही. गुजरातमधील पाटीदार पटेल आरक्षण आंदोलन समितीचा नेता हार्दिक पटेलला प्रचारासाठी आणण्याच्या खेळीचा शिवसेनेला अजिबात फायदा झाला नसल्याचे निकालावरुन दिसत आहे. 
 
शिवसेनेने 11 गुजराती उमेदवार दिले होते. पण त्यातील एकही निवडून येऊ शकला नाही. मुंबईतील गुजराती समाज प्रामुख्याने व्यापारी आणि व्यावसायिक आहे.  हा समाज भाजपाचा पारंपारिक मतदार समजला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे मुंबईतील गुजराती समाज भाजपावर नाराज असेल असे शिवसेनेने गृहित धरुन शिवसेनेने हार्दिक पटेलला प्रचारासाठी मुंबईत आणले. पण त्याचा काही फायदा झाला नाही. 
 
उपनगरातील घाटकोपर, मुलुंड, मालाड, कांदिवली आणि बोरिवली या पट्टयात भाजपाने चांगले यश मिळवले. इथल्या 49 पैकी 36 जागा भाजपाने जिंकल्या. भाजपाबरोबरची युती तुटल्यानंतर शिवसेनेने गुजराती मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यामुळे शिवसेना व्होट बँक म्हणून आपल्याकडे पाहत आहे अशी मतदारांची भावना झाली तसेच यापूर्वीची शिवसेनेची पार्श्वभूमी गुजराती विरोधाची होती. त्यामुळे गुजराती मतदार भाजपाच्या पाठिशीच ठामपणे उभा राहिला असे या समाजाच्या एका नेत्याने सांगितले. 
 
मुंबईतील गुजराती समाज जनसंघाच्या दिवसांपासून भाजपासोबत आहे. 60च्या दशकात जयवंतीबेन मेहता जनसंघाच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. शिवसेनेने समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला पण आज सर्व समाज भाजपाच्या मागे उभे राहिले. त्याशिवाय असे यश शक्य नव्हते अशी प्रतिक्रिया खासदार किरीट सोमय्या यांनी दिली.