गुहागर : गुहागरातील समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी एका दाम्पत्याचा रंगारंगी वाङनिश्चय सोहळा चक्क बोटीवर रंगला.वैभव आणि त्याची प्रेयसी पूजा देसाई असे या दाम्पत्याचे नाव. विवाहापूर्वी वाङनिश्चय सोहळा त्याचा मित्र अमितच्या आजोळी म्हणजेच गुहागरच्या समुद्रकिनारी संपन्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ही कल्पना सर्वांनाच आवडली. समुद्रकिनाऱ्यावर बोट उभी करण्यात आली. तिला सजावट करून गोरज मुहूर्तावर साखरपुड्याचे सर्व विधी बोटीवरच झाले. गुहागरचे प्रख्यात पुरोहित अशोक दीक्षित, गुहागरमधील ग्रामस्थ, नातेवाईक, पर्यटक आणि मावळत्या दिनकराच्या साक्षीने हा वाङनिश्चय सोहळा संपन्न झाला.असगोली येथील कोळी बांधवांनी पुणे व फ्रान्समधून आलेल्या पर्यटक मुला-मुलींना कोळी बांधवांची वेशभूषा परिधान केली. कोळीनृत्याच्या ठेक्यावर वैभव आणि पूजा यांच्या वाङनिश्चय सोहळ्याचा आनंद द्विगुणित झाला. गुहागरमधील या कार्यक्रमासाठी मित्राचे मामा बापू आठवले, उदय आठवले, नागरिक व पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभले.गुहागरमधील समुद्रकिनारी झालेल्या या विधीची चर्चा सर्व गुहागरकरांच्या मुखी होती. या भागात अशा पध्दतीचा कार्यक्रम प्रथमच होता. या सोहळ््याबद्दल उत्सुकता होती. गुरूवारच्या या कार्यक्रमानंतर ही उत्सुकता संपली. आता अजून काही दिवस या सोहळ्याची चर्चा सुरू राहील हे नक्की. (वार्ताहर)समुद्रकिनारी रंगला दाम्पत्याचा रंगारंगी वाङनिश्चय, बोटीवरील कार्यक्रम पाहण्यासाठी झाली होती गर्दी. वैभव, पूजा देसार्इंचा निश्चय पूर्ण, मित्राच्या आजोळी रंगला कार्यक्रम. साखरपुड्याचे सर्व विधी झाले बोटीवरच. ग्रामस्थ, पर्यटकांच्या जोडीलाच मावळत्या दिनकराची साक्ष.
गुहागरात बोटीवरच झाला वाङनिश्चय
By admin | Updated: February 13, 2015 22:57 IST