शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या कार्यालयात दोघांचा विष प्राशनाचा प्रयत्न!

By admin | Updated: December 2, 2015 02:57 IST

सर्वोपचार जिल्हा रुग्णालयातील वादानंतर घडली घटना.

अकोला - निंभोरा व सांगवी येथील रहिवासी दोघांनी पालकमंत्री तथा राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. सवरेपचार रुग्णालयात दाखल नातेवाईक रुग्णावर योग्य उपचार होत नसल्याने या दोघांनी वैद्यकीय अधिकार्‍यांना विचारणा केली असता, वैद्यकीय अधिकार्‍याने त्यांच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यामुळे या दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या वृद्धावर योग्य प्रकारे उपचार करण्यात येत नसल्याने संतोष भगत व नितीन सपकाळे यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांना याबाबत विचारणा केली. रुग्णाविषयी विचारणा केल्याने संतप्त झालेल्या वैद्यकीय अधिकार्‍याने या दोघांची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीवरील अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यात यावी, यासाठी निंभोरा येथील रहिवासी संतोष शेषराव भगत व सांगवी येथील रहिवासी नितीन उत्तम सपकाळे यांनी पिशवीमध्ये विषाची बाटली घेऊन मंगळवारी सायंकाळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे कार्यालय गाठले. पालकमंत्री कार्यालयात उपस्थित नसताना या दोघांनी पिशवीतील बाटली काढून पालकमंत्र्यांच्या कार्यालयात विष प्राशन केले. या प्रकाराची माहिती रामदासपेठ पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी सपकाळे व भगत यांच्याविरु द्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३0९ (आत्महत्येचा प्रयत्न करणे)नुसार गुन्हा दाखल केला. यापूर्वीही घडला प्रकारपालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या कार्यालयात यापूर्वीही एका इसमाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मंगळवारी पुन्हा विष प्राशनाचा प्रयत्न झाल्याने पालकमंत्र्यांच्या कार्यालयातील सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.