शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

घोड्यावरही ‘जीएसटी’चा भार!, लग्नसमारंभ आणि मिरवणुकीतील घोडेही महागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 05:27 IST

एकेकाळी राजा-महाराजांची तसेच घोडे शौकीनांची ‘शान की सवारी’ असलेली घोडेस्वारी आता महागणार असून आता घोड्यावरही १८ टक्के जीएसटीचा भार आला आहे.

संजय खांडेकर अकोला : एकेकाळी राजा-महाराजांची तसेच घोडे शौकीनांची ‘शान की सवारी’ असलेली घोडेस्वारी आता महागणार असून आता घोड्यावरही १८ टक्के जीएसटीचा भार आला आहे.पशुसंवर्धनाच्या श्रेणीतून घोड्याला वगळून याच्या खरेदीव्यवहारावर १८ टक्के जीएसटी लावण्यात आल्याने राज्यातील घोडाबाजारात मंदीचे सावट आले आहे. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम जिल्ह्यापासून ग्रामीण भागापर्यंत जाणवत आहे. घोड्यांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने तसेच त्यांच्या देखभालीचा खर्च वाढल्याने अप्रत्यक्षपणे वरात, लग्नसमारंभ आणि मिरवणुकीत भाड्याने मिळणारे घोडेही महागणार आहेत.राज्यातील घोडा खरेदी-विक्रीची बाजारपेठ असलेल्या अकलूज, सारंगखेडा, माळेगाव घोडे आणि शिरपूर चोपडा या चारही ठिकाणच्या मुख्य घोडेबाजारांमध्ये सध्या कमालीचे मंदीचे सावट आहे. त्यामुळे इतर पशुसंवर्धनाप्रमाणे घोड्यांनाही त्यात मोजले जावे आणि घोडे बाजारावरील जीएसटी रद्द करण्यात यावा, अशी मागणी राज्यस्तरीय संघटनेने जीएसटी परिषदेकडे केली आहे.