शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

GST: किमतीचे लावा नवीन स्टीकर, अन्यथा होणार कारवाई : वैधमापन शास्र विभागाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 02:29 IST

१७८ वस्तुंच्या जीएसटीत घट झाल्यानंतर त्या स्वस्त होणे अपेक्षित आहे. यासाठी विक्रेत्यांनी नवीन किमतीचे स्टिकर वस्तुवर लावावेत.

मुंबई : १७८ वस्तुंच्या जीएसटीत घट झाल्यानंतर त्या स्वस्त होणे अपेक्षित आहे. यासाठी विक्रेत्यांनी नवीन किमतीचे स्टिकर वस्तुवर लावावेत. अन्यथा कडक कारवाईचे आदेश वैधमापन शास्र नियंत्रकांनी राज्यभरात दिले आहेत. या सोबतच ‘नफाखोर विरोधी’ मोहिम उघडण्याचे संकेतदेखील विभागाने दिले आहेत.वैधमापन शास्र कायद्याअंतर्गत प्रत्येक डबाबंद वस्तुवर वजन व किंमतीची नोंद (मॅक्झिमम रिटेल प्राइज-एमआरपी) असणे बंधनकारक आहे. जीएसटी परिषदेच्या ९ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत १७८ वस्तुंवरील कर २८ वरून १८ व १२ वरून ५ टक्क्यांवर आणण्यात आले. त्यामुळे वस्तू स्वस्त होणे अपेक्षित आहे. त्यामुळे ९ नोव्हेंबरपूर्वी असलेल्या किमतीसोबतच करात घट झाल्यानंतरच्या किमतीचे नवीन स्टीकर विक्रेत्यांनी वस्तुवर लावावेत. ते लावले जात नसल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश मुंबईतील वैधमापन शास्र नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी राज्यातील सर्व विभागिय उप नियंत्रकांना दिले.अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र चेम्बर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीलाही पत्र लिहिले आहे. कमी झालेल्या कराचा फायदा प्रत्यक्ष शेवटच्या ग्राहकाला देण्यासाठी चेम्बरने विक्रेत्यांना सूचना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जीएसटी कमी झालेल्या १७८ वस्तूंचा तब्बल ६ लाख कोटी रुपयांचा माल आज देशभरात बाजारात असल्याचे अ.भा. व्यापारी महासंघांच्या पाहणीत दिसून आले आहे.इथे करा तक्रार-छापील किमतीपेक्षा अधिक दराने किंवा जीएसटीनंतर कमी झालेल्या किमतीचे नवीन स्टिकर लावले गेले नसल्यास ग्राहकांच्या तक्रारीसाठी वैध मापनशास्र विभागाचे क्रमांक आहेत. 022-22886666या क्रमांकावर ग्राहक सकाळी १० ते सायंकाळी साडे पाचदरम्यान तक्रार करू शकतात. 98696 91666या क्रमांकावरदेखील तक्रार करता येईल.

टॅग्स :GSTजीएसटी