शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थ्यांच्या अनुदानावरही जीएसटी; पालकांकडून संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 06:26 IST

उपस्थिती भत्ता, खिचडी अनुदान, शिष्यवृत्तीवरही भुर्दंड

नागपूर : प्राथमिक शाळेतील  विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध शिष्यवृत्ती व अन्य काही लाभाच्या योजनेपोटी प्राप्त होणाऱ्या अत्यंत नाममात्र अनुदानाच्या रकमेवर बँकेकडून बँक चार्जेस व जीएसटी आकारले जात आहेत. अगोदरच नाममात्र असलेल्या अनुदानातूनही रक्कम कपात होत असल्याने  पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

कोरोनाकाळात विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देता आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या खात्यावर रोख स्वरूपात अनुदान टाकण्यात आले.  काटोल तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा वलनी डफ्फर येथील २८ विद्यार्थ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली.   या विद्यार्थ्यांच्या खात्याचा तपशील मुख्याध्यापक शेषराव टाकळखेडे यांनी मागवून घेतला असता, त्यांच्या खात्यातून एसएमएस चार्जेस तीन महिन्याला १५ रुपये व जीएसटी तीन महिन्याला २.७० रुपये अशी रक्कम आकारण्यात आल्याचे दिसून आले.

असे कापले पैसेएका विद्यार्थ्याने २०१९ मध्ये ५०० रुपये भरून खाते काढले. नंतर त्याने ५०० रुपये काढून घेतले. २०२२ पर्यंत त्याने व्यवहार केला नाही. जुलै २०२२ मध्ये त्याच्या खात्यावर शालेय पोषण आहाराचे २१० रुपये जमा झाले. पण बँकेने त्याच्या खात्यातून एसएमएस चार्ज म्हणून १४५ व जीएसटीचे २५ रुपये कपात केली. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक परसराम गोंडाने म्हणाले,  १ ते ५ च्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे २१० रुपये जमा केले होते. त्यातून जीएसटी २.१० रुपये व ६ ते ८ च्या विद्यार्थ्यांच्या खात्यात ३१५ रुपये जमा केले होते, त्यांच्या खात्यातून ३.१५ रुपये जीएसटी कपात करण्यात आली. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अन्य अनुदानातूनही जीएसटी कपात करण्यात येत आहे.

बँकांचेही चार्जेस३ रुपयांपासून १८ रुपयांपर्यंत कपात अनुदानाची रक्कम मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा होते. मुख्याध्यापकांना आपल्या खात्यावरून विद्यार्थ्यांना आरटीजीएस करावे लागते. बँक मात्र या प्रक्रियेवर बँकिंग चार्ज आणि जीएसटी आकारते. त्याचे दर बँकनिहाय वेगवेगळे आहेत. विद्यार्थ्यांमागे ३ रुपयांपासून तर १८ रुपयांपर्यंत कपात होत असल्याची माहिती आहे.

शाळेच्या बचत खात्यात बॅलन्स झिरो  असेल तर ही रक्कम विद्यार्थ्यांच्या एकत्रित अनुदान रकमेतून वजा होत जाते. त्यामुळे शेवटच्या  काही विद्यार्थ्यांना ही रक्कम कमी पडते व त्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होऊ शकत नाही.  काही विद्यार्थी या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे या लाभाच्या रकमेचे आरटीजीएस जि. प. अथवा पं.स. स्तरावरून व्हायला पाहिजे. - लीलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती