शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’ हा कररूपी दहशतवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 04:58 IST

काँग्रेस सरकारने ‘जीएसटी’चा आराखडा संसदेत मांडल्यावर भाजपाने त्याला विरोध केला होता. मोदी सरकारने हा कर लागू केल्यावर काँग्रेस सरकारने त्यास विरोध केला नाही.

 लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : काँग्रेस सरकारने ‘जीएसटी’चा आराखडा संसदेत मांडल्यावर भाजपाने त्याला विरोध केला होता. मोदी सरकारने हा कर लागू केल्यावर काँग्रेस सरकारने त्यास विरोध केला नाही. मात्र त्यातील त्रुटी पाहता ‘जीएसटी’च्या रुपात भाजपा सरकारने कररुपी दहशतवाद निर्माण केला आहे, अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी रविवारी येथे केली. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात चिदंबरम यांनी देशातील अंतर्गत सुरक्षा, जीएसटी (वस्तू व सेवा कर), रिझर्व्ह बँकेची धोरणे, काश्मीर प्रश्न आदी मुद्द्यांवर मते मांडली. सीमेपलीकडील दहशतवादी कारवाया, पूर्वांचलातील राज्य सरकारे अस्थिर करण्याची कृती, कायदा हातात घेणारे समूह, नक्षलवाद आणि माओवादी कारवाया, गोरक्षकांकडून समूहाद्वारे होणारा हिंसाचार आदी समस्या देशासमोर उभ्या आहेत. सरकारने शांतता आणि संयमाने त्यांचा सामना करायला हवा, अशी सूचना त्यांनी केली.रिझर्व्ह बँकेने १३ जूनला ‘अ‍ॅसेट अँड लाएबिलिटी स्टेटमेंट’ जाहीर करणे अपेक्षित असते. मात्र, बँकांकडे किती पैसा परत आला हे उघड करायचे नसल्याने, रिझर्व्ह बँकेने प्रथमच स्टेटमेंट जाहीर केले नाही. नोटाबंदीनंतर नोटा मोजण्यासाठी तिरुपतीवरुन मशीन आणली असती तरी परत आलेले पैसे मोजून झाले असते, अशी टीकाही त्यांनी केली.काश्मीरमधील आणि पर्यायाने देशातील अंतर्गत सुरक्षा धोक्यात आली आहे. काश्मीरमधील परिस्थिती वाईटाकडून अधिक वाईटाकडे चालली आहे. लष्करी सामर्थ्य वापरुन तेथील प्रश्नांवर तोडगा काढता येईल, असे सरकारला वाटत आहे. हे धोरण काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही. सीमेवरील संघर्षामध्ये दररोज जवान शहीद होत आहेत. काश्मीरमधील जनतेवर निर्वासितांचे जीवन जगण्याची वेळ आली आहे. सरकार त्यांच्याशी संवादही साधायला तयार नाही. त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. भारत - चीन प्रश्नावर सरकारने अद्याप मौन बाळगले आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी याबाबत संसदेत विस्तृत भूमिका मांडावी, असेही ते म्हणाले.