शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

स्वच्छता उपक्रमांतून अभिवादन

By admin | Updated: October 3, 2016 01:58 IST

येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

खोर : येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सरपंच रामचंद्र चौधरी यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. या वेळी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पुरेशा लोकांची उपस्थिती नसल्याने कोरमअभावी ग्रामसभा तहकूब करण्यात आली. मात्र, काही ठराविक मुद्द्यांचे या वेळी सरपंच रामचंद्र चौधरी व तलाठी रमेश कदम यांनी अहवाल वाचन केले. यामध्ये शौचालयासंदर्भामधील मुद्दा घेण्यात आला. या वेळी गावकामगार तलाठी रमेश कदम म्हणाले, की गावामधील असलेला वाळूउपसा लवकरात लवकर बंद करण्यात यावा अन्यथा ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करून गाव बदनाम करण्यापर्यंत मला पोचवू नका, असे उपस्थितांना आवाहन करण्यात आले. आधारकार्ड योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना अशा योजनांना पुनरुज्जीवित करण्याचे काम करण्यात येणार आहे. या वेळी सरपंच रामचंद्र चौधरी, तलाठी रमेश कदम, ग्रामविकास अधिकारी अशोक लोणकर, मारुती चौधरी, मधुकर चव्हाण, बाळू डोंबे, मोहन डोंबे, मारुती फडतरे, आरोग्यसेवक डी. जी. लडकत, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त जेजुरी खंडोबा गडाच्या पायथ्याशी असलेल्या गांधीजींच्या अस्थिस्मारकास विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.जेजुरी येथील खंडोबा गडाच्या पायथ्याशी पूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे अस्थिस्मारक आहे. सन १९४८ मध्ये येथील काँग्रेसचे तत्कालीन कार्यकर्ते गुंडोपंत (अण्णा) खाडे, जनार्दन बारभाई, बाबूराव नवगिरे, बाबूलाल खान व बाबूराव रत्नपारखी व इतर मान्यवरांनी बापूजींच्या अस्थी जेजुरीत आणून स्मारक उभारले होते. सुमारे २ लाख रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात आलेल्या स्मारकाला नगराध्यक्षा साधना दीडभाई, नगरसेविका साधना दरेकर, ज्ञानेश्वरी बारभाई, नगरसेवक जयदीप बारभाई, मुख्याधिकारी समीर भूमकर, सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, अरुणअण्णा बारभाई, सुवर्णस्टार क्लबचे अध्यक्ष रज्जाक तांबोळी, राजाभाऊ खाडे, माजी नगरसेवक मुकुंद बेलसरे, संजय इनामके, राजेंद्र बारभाई, नंदू महाजन, मनोज खोमणे, अविनाश झगडे, सर्पमित्र आयुब खान, विठ्ठल सोनवणे आदींनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले