शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘ग्रीन कॉरिडॉर’मुळे दोघांना मिळाले जीवदान

By admin | Updated: April 3, 2017 01:03 IST

‘ग्रीन कॉरिडॉर’ करण्यात आला़ नाशिकमधील वोकहार्ड हॉस्पिटलमधून हृदय आणि यकृत हे अवयव विमानाने आणि रस्त्यामार्गे आणण्यात आले

पुणे : अवयव प्रत्यारोपणासाठी शहरात रविवारी दोनदा ‘ग्रीन कॉरिडॉर’ करण्यात आला़ नाशिकमधील वोकहार्ड हॉस्पिटलमधून हृदय आणि यकृत हे अवयव विमानाने आणि रस्त्यामार्गे आणण्यात आले. सकाळी हे अवयव पोहोचताच हृदय १३ वर्षांच्या मुलीवर रुबी हॉल रुग्णालयात प्रत्यारोपित करण्यात आले. यकृतही केईएम रुग्णालयातील एका रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आल्याने दोघांना जीवदान मिळाले.संगमनेर येथील २९ वर्षीय तरुणाचा ३ दिवसांपूर्वी अपघात झाला. त्याला नाशिकमधील वोकहार्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला शनिवारी डॉक्टरांनी ब्रेनडेड जाहीर केले. त्याच्या आप्तांनी अवयवदानाची तयारी दाखविल्याने त्याचे हृदय रविवारी सकाळी शस्त्रक्रिया करून काढण्यात आले. नाशिक येथून खासगी विमानाने ते सकाळी सव्वानऊ वाजता हलविण्यात आले. लोहगाव विमानतळावर ते सव्वादहाच्या सुमारास पोहोचल्यावर लोहगाव ते रुबी हॉल रुग्णालयादरम्यान ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला. केवळ ८ मिनिटांमध्ये ८ किलोमीटर अंतर पार करण्यात आले. चाकण रस्त्यावरील मोशी टोलनाका ते केईएम हॉस्पिटल दरम्यान ग्रीन कॉरिडॉर करण्यात आले. २४ किलोमीटरचे अंतर केवळ २० मिनिटांमध्ये पार पडले. सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेला यकृत प्रवास अडीच तासांनी दुपारी १२ वाजता संपला. (प्रतिनिधी)>संगमनेरमधील याच तरुणामुळे पुण्यातील दोन जणांना जीवदान मिळाले आहे. त्याचे मूत्रपिंडही वोकहार्डमधील एका रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आले. त्याचे यकृत वोकहार्ड रुग्णालयातून रास्ता पेठेतील केईएमपर्यंत आणण्यात आले. नाशिकहून अ‍ॅम्ब्युलन्समधून यकृत आणले गेले. यकृतही केईएम रुग्णालयातील एका रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आले, अशी माहिती अवयव प्रत्यारोपण समितीच्या (झेडटीसीसी) समन्वयक आरती गोखले यांनी दिली.