मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून (म्हाडा) विविध पदे भरण्यासाठी मागविलेल्या अर्जांना उमेदवारांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. २४४ जागांसाठी म्हाडाकडे तब्बल ४६ हजार अर्ज आले आहेत. परीक्षा शुल्क न भरल्याने भरतीत सहभागी होऊ इच्छिणारे ४ हजार जणांचे अर्ज बाद ठरले आहेत.म्हाडातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी, लेखाधिकारी, मिळकत व्यवस्थापक अशा सुमारे १७ पदांसाठी ५ ते २७ आॅगस्टपर्यंत आॅनलाइन अर्ज मागविले होते. या परीक्षेला बसणाऱ्या अंध, अल्पदृष्टी किंंवा शारीरिक चलनवलन बाधित असलेले आणि लेखनाचा वेग बाधित असणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षेच्या कालावधीत स्वत:च्या निवडीने लेखनिकाची सेवा घेता येणार आहे. लेखनिकाची मदत घेणाऱ्या उमेदवाराला परीक्षेसाठी असलेल्या प्रत्येक तासाकरिता २0 मिनिटे अधिक वेळ दिला जाणार आहे. (प्रतिनिधी)लिपिक पदासाठी सर्वाधिक अर्जया अर्जांमध्ये सर्वाधिक म्हणजे ३५ हजार अर्ज लिपिक पदासाठी आल्याचे, म्हाडा अधिकाऱ्याने सांगितले. या पदांसाठी सप्टेंबर किंंवा आॅक्टोबर महिन्यात परीक्षा घेण्यात येणार आहे.
म्हाडा भरतीला भरघोस प्रतिसाद
By admin | Updated: September 15, 2015 02:28 IST