१९६२ साली विधानसभेची निवडणूक झाली. यात काँग्रेसने ५१.२२ टक्क्यांसह २१५ जागा जिंकत राज्यावरील आपली पकड मजबूत असल्याचे दर्शविले. यशवंतराव चव्हाण यांच्या जागी मारुतराव कन्नमवार यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. १९६७दुसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक झाली. एकूण २७० जागांपैकी २०३ जागा जिंकत पुन्हा काँग्रेस सत्तेवर आली. काँग्रेसला यावेळी वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्रीपदी फेरनिवड करण्यात आली.१९७२ ला झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने २२२ जागा जिंकत आपली पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले. वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्रीपदी पुन्हा निवड करण्यात आली.१९७८ प्रथमच महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही एका पक्षाला संपूर्ण बहुमत मिळाले नाही. आणिबाणीमुळे इंदिरा गांधी यांची लोकप्रियता कमी झाल्याने याच काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (अर्स) आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) अशी दोन शकले झाली. शरद पवार हे मुख्यमंत्री झाले आणि नासिकराव तिरपुडे हे उपमुख्यमंत्री झाले. १९८०पुन्हा निवडणुका झाल्या. केंद्रात इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर ४४.५० टक्के मते मिळविताना २८८ जागांपैकी काँग्रेसने १८६ जागा मिळविल्या. अब्दुल रहिमान अंतुले हे १९८२ पर्यंत मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर बाबासाहेब भोसले, वसंतदादा पाटील आणि शिवाजीराव निलंगेकर हे या काळात मुख्यमंत्री राहिले. १९८५ काँग्रेसने ४३.४१ टक्के मते मिळविताना २८८ पैकी १६१ जागा मिळविल्या. शिवाजीराव निलंगेकर हे पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्यांना दूर करत शंकरराव चव्हाण दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. शरद पवार यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर १९८८ साली चव्हाण यांच्या जागी शरद पवार यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. १९९० काँग्रेसने १४१ जागा मिळविल्या. ३८.१७ टक्के मते मिळाली तरी काँग्रेसच्या २० जागा कमी झाल्या. १९९५ साली युतीने पहिल्यांदा राज्यात सत्ता खेचून आणण्यात यश मिळविले. ३१ टक्के मते मिळवित काँग्रेसने ८० जागा मिळविल्या. १९९९काँग्रेसमधून बाहेर पडत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. यावेळी काँग्रेसने २७.२ टक्के मत मिळविताना ७५ जागा मिळविल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापना केली. २००४ २१.०६ टक्के मतांसह काँग्रेसने ६९ जागा मिळविल्या. २००९ काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली. काँग्रेसने ८२ तर राष्ट्रवादीने ६२ जागा मिळवित पुन्हा सत्ता खेचून आणली. यावेळी काँग्रेसला ३६.५१ टक्के मते मिळाली.
यश-अपयशाचा आलेख
By admin | Updated: September 29, 2014 06:52 IST