शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाचा शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर

By admin | Updated: March 29, 2016 01:52 IST

मुंबई विद्यापीठाचा २०१६-१७ आर्थिक वर्षाचा शिलकीचा अर्थसंकल्प सोमवारी पार पडलेल्या अधिसभेत मंजूर करण्यात आला आहे. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी ६ कोटी

मुंबई : मुंबई विद्यापीठाचा २०१६-१७ आर्थिक वर्षाचा शिलकीचा अर्थसंकल्प सोमवारी पार पडलेल्या अधिसभेत मंजूर करण्यात आला आहे. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी ६ कोटी ३९ लाख ५४ हजार रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला.यंदाच्या अर्थसंकल्पात विविध नावीन्यपूर्ण योजनांसह अनेक विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये कौशल्य विकास केंद्र, मेक इन इंडिया केंद्र, डिजिटल विद्यापीठ, संरक्षित जागेचा विकास, स्मार्ट गाव योजना, शैक्षणिक विद्वत्तेची जोपासना, विद्यार्थी व्यवसाय मार्गदर्शन केंद्र, रेल्वे संशोधन केंद्र, विद्यापीठाची सामाजिक जबाबदारी यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या १६० व्या वर्धापन दिनासाठी अर्थ संकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे.यावेळी नियोजित बांधकामांमध्ये विद्यानगरीमध्ये विविध बांधकामे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यात येथील अ‍ॅकॅडमिक स्टाफ कॉलेजच्या वसतिगृहाचे बांधकाम, बाबु जगजीवनराम छात्रावास योजनेअंतर्गत मुला-मुलींच्या वसतिगृहांचे बांधकाम, हिंदी भाषा भवनचे बांधकाम, मल्टीपर्पज हॉलचे बांधकाम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी निवासस्थानांच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात आले आहे. शिवाय झाराप येथे सिंधू स्वाध्याय संस्था आणि ठाणे उपकेंद्रामध्ये मुला-मुलींसाठी वसतिगृहांचे बांधकाम करण्याची घोषणा देशमुख यांनी केली.स्वामीनाथन यांना डी. लिटअधिसभेच्या बैठकीत हरीत क्रांतीचे जनक डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांना मुंबई विद्यापीठाची अत्यंत मानाची असलेली डी. लिट ही सर्वोच्च पदवी बहाल करण्याविषयीचा ठराव आज अधिसभेत एकमुखाने मंजूर करण्यात आला. मुंबई विद्यापीठाने २००२ साली सुप्रसिध्द अर्थशास्त्रज्ज्ञ डॉ.अमर्त्य सेन यांना मानद डी.लिट ही पदवी बहाल केली होती. (प्रतिनिधी)२०१६-२०१७ नवीन उपक्रम/योजनांसाठी प्रस्तावित केलेल्या निधीची आकडेवारीविद्यापीठाचे मल्टी-डायमेन्शनल विकास कार्यक्रमांतर्गत शारीरिक शिक्षणाचे श्रेष्ठत्व केंद्र उभारण्यासाठी, क्रीडा व संरक्षण पुनर्वासनाचे श्रेष्ठत्व केंद्र उभारण्यासाठी, नवीन्यपुर्ण व उद्योगजकत्वाचे श्रेष्ठत्व केंद्र आणि क्रीडा श्रेष्ठत्व केंद्र उभारणीसाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.विद्यापीठाने सुरू केलेल्या संरक्षित जागेचा विकास उपक्रमासाठी यावेळी पाणथळ जागांसाठी १ कोटी आणि वनस्पती शास्त्र उद्यानासाठी १ कोटी रुपयांची घोषणा कुलगुरुंनी केली.स्मार्ट गाव योजनेसाठी यावेळी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठाची सामाजिक जबाबदारी जपताना स्वच्छ कॉलेज अभियान राबवण्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.विद्यापीठाच्या १६० व्या स्थापना दिवस कार्यक्रमासाठी सुमारे २ कोटी ७० लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. त्यात चर्चासत्रे व कार्यशाळा आणि प्रकाशने यांसाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. तर माहितीपट व चित्रपटांच्या निर्मितीसाठी ५० लाख आणि भाषणांच्या मालिकांसाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. च्तर विद्यापीठ सुधारणा करताना ब्रॅन्डींग अँड पोर्टल डिझाईनिंगसाठी २५ लाख रुपयांची तरतूद आहे. विद्यापीठाचे ब्रिक्स आणि जागतिक विद्यापीठामध्ये रँकिंग सुधारण्यासाठी २० लाख रुपये ठेवण्यात आले आहे.