शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कर्तव्यावरील जखमी, मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 06:23 IST

राज्य शासनाचा निर्णय : मृतासाठी १५ लाख तर जखमीसाठी साडेसात लाख

पुसद (यवतमाळ) : निवडणूक कर्तव्य ही शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण कर्तव्यापेक्षा वेगळ्या प्र्रकारची असतात. ही कर्तव्ये पार पाडताना निवडणूक कर्मचाºयांना जोखीम अथवा धोका यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे निवडणूक कर्तव्य बजावताना जखमी अथवा मृत झालेल्या अधिकारी, कर्मचाºयांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

निवडणूक कामासाठी दिल्या जाणाºया प्रशिक्षणासह कर्मचारी आपल्या घरातून बाहेर पडल्यापासून ते निवडणुकीशी संबंधित कर्तव्य पार पाडून आपल्या कार्यालयात किंवा घरी परत येईपर्यंतचा कालावधी या अनुदानासाठी ग्राह्य धरला जाणार आहे.भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या किंवा राज्याच्या बाबतीत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या एक किंवा अनेक जागा भरण्यासाठी घेण्यात येणाºया निवडणुका म्हणजेच राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद, विधानसभेच्या सार्वजनिक व पोटनिवडणुकांसाठी हा नियम लागू होणार आहे.

निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना मृत पावलेल्या अधिकारी व कर्मचाºयांच्या वारसांना आता १५ लाख रुपये, अतिरेकी अथवा नक्षलवाद्यांच्या कारवाईत बॉम्बस्फोट, सुरुंग अथवा शस्त्रांचा हल्ला होऊन मृत पावलेल्या अधिकारी व कर्मचाºयांच्या वारसांना ३० लाख रुपये, कायमस्वरूपी अपंगत्व (हात, पाय, डोळे, गमावणे) आदींसाठी सात लाख ५० हजार रुपये, तर अतिरेकी कारवायांमध्ये कर्मचाºयांना कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १५ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय शासनाचे उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी अ.ना. वळवी यांच्या स्वाक्षरीने पारित करण्यात आलेल्या आदेशात ११ एप्रिल २०१९ रोजी घेण्यात आला. निवडणूक घोषित झाल्याच्या तारखेपासून हा निर्णय लागू होणार आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक