शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गवासीयांचे ग्रामदैवत सातेरीदेवी, उद्योगनगरीतील शक्तिपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:55 IST

यमुनानगर, निगडी येथील श्री सातेरीदेवीचे मंदिर सिंधुदुर्गवासीयांचे ग्रामदैवत आहे. १९९९मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणी बांधवांनी एकत्र येऊन सातेरीदेवीच्या मंदिराची उभारणी केली.

यमुनानगर, निगडी येथील श्री सातेरीदेवीचे मंदिर सिंधुदुर्गवासीयांचे ग्रामदैवत आहे. १९९९मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणी बांधवांनी एकत्र येऊन सातेरीदेवीच्या मंदिराची उभारणी केली. गगनगिरीमहाराज यांच्या हस्ते २५ आॅक्टोबर २००७ रोजी मूर्तीची प्रतिष्ठापना केली.मंदिराच्या कळसाचे बांधकाम व नक्षीकाम २००८ रोजी पूर्ण झाले. लोणावळा येथील फलाहारीमहाराज यांच्या हस्ते कलशारोहणाचा कार्यक्रम झाला. या वर्षी मंदिराच्या सभागृहाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.भजन, दांडिया, मंगळागौरीचे खेळ, फुगड्यांचे खेळ, तसेच महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. येथे अष्टमीला चंडिका होमही केला जातो. दसºयाच्या दिवशी कोकणी पद्धतीने सोने लुटण्याचा कार्यक्रम साजरा करण्यात येतो. मंदिराचे अध्यक्ष विजय परब आहेत, कार्याध्यक्ष प्रकाश भोसले, तर चिटणीस वसंत कदम आहेत.मंदिराच्या माध्यमातून कोकणी बांधवांनी एकात्मतेचा संदेश दिला आहे. गावाकडील कार्यक्रमांप्रमाणेच या ठिकाणी कार्यक्रम घेतले जातात. जेणेकरून नोकरी-व्यवसायातून गावाकडे जाता आले नाही, याचे शल्य मनाला लागू नये. पुरुषांसाठी दांडिया हा वेगळा प्रयोग मंडळाने राबवला आहे. सातेरीदेवी सेवा ट्रस्ट, उत्सव समिती, सल्लागार समिती, सातेरीदेवी महिला व श्रीसुक्त मंडळ, महिला भजनी मंडळ आदींच्या माध्यमातून वर्षभर मंदिरात विविध उपक्रम सुरू असतात. नवरात्रीमध्ये दररोज सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. भजन, कीर्तनाबरोबरच महिला-मुलांसाठी पाककला, चित्रकला, मेंदी व रांगोळी आदी स्पर्धा घेण्यात येतात. दसºयाला सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचा कार्यक्रम असतो.