शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Gram Panchayat Election Result: संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज्य संघटनेचा पहिला विजय, या ग्रामपंयातीवर फडकवला झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 11:04 IST

Gram Panchayat Election Result 2022: राज्यातील सुमारे ७१३५ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे. त्यामध्ये राज्यातील विविध भागातील कल समोर येत आहेत.

मुंबई - राज्यातील सुमारे ७१३५ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे. त्यामध्ये राज्यातील विविध भागातील कल समोर येत आहेत. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेनेही या निवडणुकीच्या माध्यमातून जनमताचा कौल घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यात नाशिकमधील देवळा येथील वासोळ ग्रामपंचायतीमध्ये संभाजीराजेंच्या स्वराज संघटनेला पहिलं यश मिळालं आहे. स्वराज संघटनेने वासोळ ग्रामपंचायतीवर विजयाचा झेंडा फडकला आहे.

दरम्यान, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सत्ताधारी भाजपा व शिंदे गट आणि महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनेलमध्ये चुरस दिसून येत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांमध्ये भाजपा आणि शिंदे गटाने ३६० ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. तर मविआने ३६३ ठिकाणी बाजी मारली आहे. तर १७० ग्रामपंचायतींवर इतरांनी कब्जा केला आहे.

राज्यभरातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले होते. या निवडणुकीसाठी ७४ टक्क्यांपर्यंत मतदानाची आकडेवारी गेली होती, सदस्यांसह थेट सरपंचांची निवड करणाऱ्या या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे.

ग्रामपंचायतीची निवडणूक कोणत्याही राजकीय  पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसली तरी निकालानंतर सर्वच पक्षांकडून आपला उमेदवार विजयी झाल्याचा दावा केला जात असल्याने या दाव्यांत कुठला पक्ष प्रबळ ठरतो याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती