शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक राज्यातील परिवर्तनाची नांदी ठरेल: चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 16:47 IST

दवीधर व शिक्षक निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील जनतेचा कौल नक्की कुणाच्या बाजूने आहे याची पूर्णपणे जाणीव होईल..

पुणे : राज्यात पदवीधर व शिक्षक मतदार संघांसाठी मंगळवारी ( दि. १) मतदान होत आहे. या निवडणुकीत पुणे मतदारसंघ वगळता राज्यात इतर ठिकाणी राष्ट्रवादी व भाजपा यांच्यातच थेट लढत होत आहे. त्यामुळे प्रमुख भाजप व राष्ट्रवादी यांच्यासह मनसेने देखील ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकीत भाजपच्या विजयाची खात्री व्यक्त करतानाच महाविकास आघाडीला जोरदार निशाणा साधला आहे. 

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीचा निकाल ३ तारखेला जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातील मतदारांचा कौल स्पष्ट करताना आगामी निवडणुकांच्या धर्तीवरही निवडणूक महाविकास आघाडी व भाजप यांच्यासाठी फार महत्वाची ठरणार आहे. 

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले,राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी भाजपाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद करतो. पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी होणारी निवडणूक महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. तसेच ही निवडणूक राज्यातील महाविकास आघाडीला एक मोठा हादरा देणारी असणार आहे. लोकाशाहीमध्ये जनतेकडे मतदान हेच एकमेव असे प्रभावी शस्त्र आहे, जे सरकारला त्यांच्या अपयशी कारभाराची जाणीव करून देतो. या निवडणुकीच्या माध्यमातून लोक आघाडी सरकारला किती कंटाळले आहेत हे समजेल. यासोबतच सरकारमध्ये नसूनही ज्या प्रकारचे समर्थन पदवीधर आणि शिक्षकांनी आमच्या कार्यकर्त्यांना संपूर्ण राज्यात केले, ते फारच उत्साहवर्धक होते. या निवडणुकीमुळे सरकारच्या बहुमताला काही फरक पडणार नाही, मात्र पुढे तरी सरकार जनहितार्थ कार्य करण्याचा विचार तरी करेल, अशी इच्छा व्यक्त करतो.”

पदवीधर व शिक्षक निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील जनतेचा कौल नक्की कुणाच्या बाजूने आहे याची पूर्णपणे जाणीव होईल असेही पाटील यावेळी म्हणाले. 

 

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलPoliticsराजकारणState Governmentराज्य सरकारVotingमतदान