शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांचा राजीनामा

By admin | Updated: August 25, 2014 04:10 IST

के. शंकरनारायणन यांनी रविवारी राष्ट्रपतींनी मिझोरामच्या राज्यपालपदी बदली करताच स्वाभिमानी बाण्याने राजीनामा दिला आणि पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रिय होणार असल्याचे पत्रपरिषदेत जाहीर केले.

मुंबई : राष्ट्रपतींचा आदेश असेल तरच मी राजीनामा देईन, अशी भूमिका काही दिवसांपूर्वी मांडून राजीनाम्याचा दबाव झुगारणारे महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी रविवारी राष्ट्रपतींनी मिझोरामच्या राज्यपालपदी बदली करताच स्वाभिमानी बाण्याने राजीनामा दिला आणि पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रिय होणार असल्याचे पत्रपरिषदेत जाहीर केले. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने नियुक्त केलेल्या राज्यपालांच्या राजीनाम्याचे सत्र काही दिवसांपूर्वी सुरू झाले तेव्हाच शंकरनारायणन यांच्या राजीनाम्याची चर्चा होती. तथापि, राष्ट्रपती भवनातून आदेश येत नाही तोवर आपण पद सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. शनिवारी रात्री १२.३० वाजता त्यांची मिझोरामचे राज्यपाल म्हणून बदली करण्यात आल्याचे आदेश राष्ट्रपती भवनातून येथील राजभवनात धडकले. सूत्रांनी सांगितले की, या बदलीने व्यथित झालेले शंकरनारायणन यांनी त्याचवेळी राजीनाम्याचा निर्णय घेतला. रविवारी पत्रपरिषद घेऊन त्यांनी त्याची घोषणा केली. उणीपुरी ४ वर्षे ७ महिने महाराष्ट्राचे राज्यपालपद भूषविलेले शंकरनारायणन हे केरळमधील काँग्रेसचे दिग्गज नेते होते. अनेक वर्षे त्यांनी केरळमध्ये मंत्रिपद भूषविले आहे. शंकरनारायणन महाराष्ट्राचा निरोप घेताना म्हणाले, मला राज्यपाल होण्याचा बहुमान घटनेमुळे मिळाला. आज मी राज्यपाल पदाचा राजीनामा देऊन त्या घटनेचा आदर केला आहे. राज्यपालपदावरून मी कधीही राजकारण केले नाही. मला असलेल्या अधिकाराचा वापर करून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी सांगितले.नागालँड आणि झारखंडचे राज्यपालपद भूषविल्यानंतर २२ जानेवारी २०१० रोजी शंकरनारायणन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. ८ सप्टेंबर २०११ ते ३ मे २०१२ दरम्यान त्यांच्याकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार होता. नागालँडचे राज्यपाल असताना त्यांच्याकडे काही काळ आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार होता. आतापर्यंत सहा राज्यांचे राज्यपालपद त्यांनी भूषविले आहे. २८ एप्रिल २०१२ रोजी त्यांची राष्ट्रपतींनी पाच वर्षांसाठी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली. त्यांचा कार्यकाळ २८ एप्रिल २०१७ रोजी संपणार होता. (विशेष प्रतिनिधी)