शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! १२ नावांची यादी राज्यपाल कोश्यारींकडून अखेर रद्द; 'मविआ'ला दणका

By यदू जोशी | Updated: September 4, 2022 12:01 IST

यादी सरकारला परत पाठविली, मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीवर तत्काळ कार्यवाही

मुंबई - उद्धव ठाकरे सरकारने विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी पाठविलेली १२ नावांची यादी अखेर राज्यपालांनी रद्द केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली होती. राजभवनातून शनिवारी सायंकाळी पूर्वीची यादी मुख्यमंत्री कार्यालयाकडे परत पाठविण्यात आली. ठाकरे सरकारने पाठविलेली ही यादी आता रद्द समजण्यात येत आहे असे राजभवनने मुख्यमंत्री कार्यालयास पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

ठाकरे सरकारने पाठविलेल्या यादीला राज्यपालांनी दोन वर्षे मान्यता दिली नव्हती. मात्र, शिंदे यांच्या शिफारशीला लगेच  प्रतिसाद देत ठाकरे सरकारची १२ जणांची यादी रद्द करण्याची भूमिका राज्यपालांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून आधीची यादी रद्द झाल्याने आता शिंदे-फडणवीस सरकारने नवीन १२ सदस्य नियुक्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने नवीन यादी राज्यपालांकडे पाठविली जाईल, अशी माहिती आहे. 

अधिवेशनापूर्वी १२ जागा भरल्या जाण्याची शक्यताविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार आहे. या अधिवेशनापूर्वी या १२ जागा भाजप-शिंदे यांच्याकडून भरल्या जातील अशी शक्यता आहे. विधान परिषदेचे सभापतीपद सध्या रिक्त आहे. आधीचे सभापती रामराजे निंबाळकर  (राष्ट्रवादी) यांच्या जागी भाजपला सभापतीपद हवे आहे. सध्याचे विधान परिषदेतील संख्याबळ लक्षात घेता ते शक्य नाही. मात्र, १२ जागा भाजपला मिळाल्यानंतर पक्षाचे विधान परिषदेत २४ आमदार असून दोघांचा भाजपला पाठिंबा आहे.

७८ सदस्यांच्या सभागृहात सभापती निवडून आणण्यासाठी हे संख्याबळ पुरेसे नाही पण आणखी १२ (शिंदे गटासह) आमदार राज्यपाल नियुक्त झाले म्हणजे भाजपचे संख्याबळ ३८ होईल व सभापतीपद आपल्याकडे घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही. शिवसेनेचे १२, काँग्रेसचे १० आणि राष्ट्रवादीचेही १० आमदार आहेत. तिघे एकत्र आले तरी भाजपलाच सभापतीपद मिळेल. सध्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे शिवसेनेच्या आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही शिवसेनेचेच आहेत. विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेने परस्पर घेतल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी या मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी