शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

‘शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष’

By admin | Updated: April 20, 2015 03:09 IST

केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार केवळ घोषणा करीत असून, अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे

मुंबई : केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार केवळ घोषणा करीत असून, अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे त्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी केला़ खासदार चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्यात दुष्काळ आणि गारपिटीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना २ टक्क्यांपेक्षा जास्त मदत करता येणार नसल्याचे वक्तव्य केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी नागपुरात केले होते़ त्यांची ही भाषा म्हणजे शेतकऱ्यांप्रती भाजपा सरकारच्या अनास्थेचा पुरावाच आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता येत नसतील तर केंद्र व राज्य सरकारमधील मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी त्यांनी पत्रकात केली आहे़ राज्यातील नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. हातातोंडाशी आलेली पिके नष्ट झाल्याने शेतकरी आत्महत्या होत आहेत. अशावेळी शेतकऱ्याला भरीव आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी देण्याऐवजी केवळ २ टक्के मदत दिली जाईल, असे सांगणे म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच म्हणावी लागेल. केंद्र आणि राज्यात नवे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांना मदतीचा हात तर सोडाच पण नैसर्गिक आपत्तीतून बचावलेल्या शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळणेही कठीण झाल्याचा आरोप खासदार चव्हाण यांनी पत्रकात केला आहे़