शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

सरकारचे ९२.६३ कोटी पाण्यात

By admin | Updated: August 26, 2015 01:09 IST

बाळगंगा सिंचन प्रकल्पातील कामाचे कंत्राट एफ. ए. एन्टरप्रायझेसला मिळवून देताना सरकारचे ९२ कोटी ६३ लाख ४२ हजार ११० रुपयांचे नुकसान करण्यात आल्याचे सिंचन

ठाणे : बाळगंगा सिंचन प्रकल्पातील कामाचे कंत्राट एफ. ए. एन्टरप्रायझेसला मिळवून देताना सरकारचे ९२ कोटी ६३ लाख ४२ हजार ११० रुपयांचे नुकसान करण्यात आल्याचे सिंचन घोटाळ््याच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. भागीदारी निवृत्ती करारात उणिवा असताना आणि टर्नओव्हरच्या अटींची पूर्तता होत नसतानाही त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून हे कंत्राट मिळून दिल्याचे आणि निविदा प्रक्रियेचे नियमही धाब्यावर बसवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. राज्य सरकारच्या या प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) अनेक तक्रारी आल्या होत्या. यासंदर्भात सरकारने चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार ठाणे एसीबीने विशेष चौकशी पथक स्थापन करून कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या अखत्यारीतील प्रकल्पांची चौकशी सुरू केली होती. याचदरम्यान या धरणाचे कंत्राटदार मेसर्स एफ. ए. एन्टरप्रायजेसचे भागीदार निसार खत्री व त्यांच्या कुटुंबीय दिल्याते निदर्शनास आले. यात जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे उघडकीस आले. पोलीस निरीक्षक हनुमंत वेताळ यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. चौकशीत एफ. ए. एन्टरप्रायजेसचे भागीदार निसार खत्री व इतरांनी निविदा प्रक्रिया स्पर्धात्मकरीत्या झाल्या असल्याचे भासवले. आर. एन. नायक आणि सन्स, हुबळी या कंपनीने निविदा प्रक्रियेत भाग घेतल्याचे दर्शवण्यात आले. त्यासाठी त्यांनी आर. एन. नायक अ‍ॅण्ड सन्सच्या नावाने बनावट निवीदा भरणे, या कंपनीसाठी एफ. ए. कन्स्ट्रक्शनच्या बँक खात्यातून २५ लाखांचा इसाराच्या रकमेचा डिमांड ड्रफ्ट देणे, बनावट लेटरहेड्स तसेच बनावट निविदेसाठी १ कोटी ५२ लाखांची बनावट बँक गॅरेंटी बनविणे असे प्रकार केले. हे करताना बनावट कागदपत्रे खरी असल्याचे भासवण्यात आले. टेंडर प्रक्रियेमध्ये भाग घेऊन केआयडीसीची आणि शासनाची फसवणूक करण्यात आली. याला एफ. ए. एन्टरप्रायजेसचे भागीदार फतेह मोहम्मद अब्दुल्ला खत्री, निसार फतेह मोहम्मद खत्री, जैतून खत्री, अबीद खत्री, जाहीद खत्री जबाबदार असल्याचा दावा करीत एसीबीने गुन्हा दाखल केला. त्यानुसार आता दोषी सरकारी अधिकारी आणि कंत्राटदार निसार खत्री, त्यांचे कुटुंबीय यांच्या घर तसेच कार्यालयाची झडती घेण्यास सुरुवात झाली आहे. उपाधीक्षक सुनील कलगुटकर हे पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार सुनील तटकरे यांच्यापाठोपाठ माजी जलसंपदा मंत्री व आमदार अजित पवार यांनीही मंगळवारी चौकशीला दांडी मारली. पवार यांनाही शनिवारी ठाणे लाचलुचपत विभागाने ठाण्यात चौकशीसाठी बोलावले होत; मात्र ते हजर राहिले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.