शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

निवडणुकीत फटका बसल्यावर सरकारला जाग; ७५ हजार नोकरभरतीचे काय झाले? मागविली माहिती

By विकास राऊत | Updated: June 7, 2024 10:09 IST

सरकारने छत्रपती संभाजीनगर, पुणे, कोकण, नागपूर, अमरावती, नाशिक या विभागातून किती नोकरभरती झाली, याची माहिती विभागनिहाय मागविली आहे. 

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत महायुतीला बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, कांदा, सोयाबीनसह मराठा आरक्षणाच्या मुद्याने जमिनीवर आणले. निवडणुकीत फटका बसल्यानंतर आता सरकार खडबडून जागे झाले असून, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार नोकरभरतीच्या  घोषणेवर काय काम केले, याची माहिती सरकारने विविध विभागांकडून शुक्रवारी  सकाळी ११:०० वाजेपर्यंत मागविली आहे. 

७५ हजार नोकरभरतीची घोषणा होऊन २ वर्षे झाली. मात्र, मंत्रालयातील वेळकाढू अधिकारी व झारीतील शुक्राचार्यांनी घोषणेची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली. परिणामी लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात  आहे. नोकरभरतीबाबत ज्या विभागाने हलगर्जीपणा केला असेल, त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. सरकारने छत्रपती संभाजीनगर, पुणे, कोकण, नागपूर, अमरावती, नाशिक या विभागातून किती नोकरभरती झाली, याची माहिती विभागनिहाय मागविली आहे. 

मंत्रालय पातळीवरील सर्व विभागांना पत्रअपर मुख्य सचिव (सेवा) विभागाच्या सहसचिव गीता कुलकर्णी यांनी गुरुवारी सर्व सहसचिव, उपसचिव, मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत ७५ हजार रिक्त पदे भरण्यासाठी आपल्या विभागाने केलेल्या कार्यवाहीची सद्यस्थिती काय आहे, हे कळवावे. 

या माहितीचा मागविला अहवालऑगस्ट २०२३ ते मे २०२४ अखेरपर्यंत नियुक्ती आदेश दिलेल्या पदांची संख्या, परीक्षेचा निकाल लागला असून, नियुक्तीपूर्वी कागदपत्रे तपासणी सुरू असलेल्या पदांची संख्या, कंपनीबरोबर करारनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, पण अद्याप परीक्षेचा निकाल लागलेला नाही, अशा पदांची संख्या, या माहितीचा अहवाल प्रशासकीय विभागांकडून सरकारने मागविला आहे. 

बहुतांश नोकरभरती झालेली आहे. नोकरभरतीची माहिती मागविली आहे. सोमवारपर्यंत माहिती येईल.    - नितीन गद्रे, अपर मुख्य सचिव (सेवा) 

टॅग्स :jobनोकरीMaharashtraमहाराष्ट्र