नांदेड : पेट्रोल, डिझेलची दरवाढ तसेच सेवाकरात वाढ करून सरकारने जनतेचे पाकीट मारले, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी शनिवारी केली़महागाई, भ्रष्टाचार प्रकरणी काँग्रेसने खा़ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथे शनिवारी निदर्शने केली़ जिल्ह्यातून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांसमोर बोलताना ते म्हणाले, सरकारने निवडणुकांच्या वेळी मोठी आश्वासने दिली़ अच्छे दिनचे स्वप्न दाखविले़ शेवटी जनतेच्या पदरी निराशा आली़ महागाईचा आलेख वाढत आहे़ शेतकऱ्यांना कायम संकटात लोटण्याचे काम केंद्र व राज्य सरकारने केले आहे़गेल्या काही महिन्यांत शेतकरी आत्महत्यांमध्ये झालेली वाढ ही चिंताजनक आहे़ शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करणे आवश्यक असताना, सरकार निद्राधीन आहे़, अशी टीका त्यांनी केली. (प्रतिनिधी)
सरकारने जनतेचे पाकीट मारले - चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2016 00:45 IST