शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सरकार लवकरच कोसळणार

By admin | Updated: March 31, 2017 03:57 IST

निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने सत्तेवर येताच मात्र कर्जमाफी

नागपूर : निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने सत्तेवर येताच मात्र कर्जमाफी मिळणार नाही, असा पावित्रा घेतला आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार लवकरच कोसळेल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी बुटीबोरी येथे केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सर्वपक्षीय विरोधकांनी काढलेली संघर्ष यात्रा गुरुवारी बुटीबोरी येथे पोहोचली. या वेळी झालेल्या जाहीर सभेत नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल चढविला. गेल्या दोन वर्षात नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी म्हणून ही संघर्ष यात्रा काढली आहे. तुम्ही (शेतकऱ्यांनी) आम्हाला हिंमत द्या, लाठ्या-काठ्या खायला आम्ही तयार आहोत, असे आवाहन खा. चव्हाण यांनी केले. तर सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांनी केली. माजी मंत्री जयंत पाटील, शेकापचे धैर्यशील पाटील, समाजवादी पक्षाचे नेते आ. अबू आझमी यांनीही सरकारवर टीका केली.नव्या समीकरणाचे संकेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, रिपब्लिकन पक्ष, एमआयएम. युनायडेट जनता दल यासारखे विविध राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. हे आगामी महाराष्ट्रातील नव्या राजकीय समीकरणाचे संकेत आहेत, असेही खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले...अन् बस सुरू झालीसंघर्ष यात्रेत सहभागी असलेले सर्व नेते एका बसने प्रवास करीत आहेत. बुटीबोरी येथील जाहीर सभा संपल्यावर नागपूर शहरातील व्हेरायटी चौकात दुसरा कार्यक्रम होता. बुटीबोरीची सभा आटोपून सर्वच बसमध्ये बसले. परंतु बस काही सुरू होत नव्हती. पुढच्या कार्यक्रमाला उशीर होऊ नये म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण हे लगेच बसमधून उतरले आणि दुसऱ्या चार चाकी वाहनाने पुढे निघाले. थोड्या वेळाने बसही सुरू झाली आणि सर्व जण पुढे निघाले. (प्रतिनिधी)भाजपा नेत्यांनी मन की बात बंद करून कर्जमाफीची घोषणा करावी. शेतकरी व कष्टकऱ्यांना न्याय मिळावा. यासाठीच संघर्ष यात्रा काढण्यात आल्याचे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. सिंदेवाही ते पनवेल अशी निघालेली संघर्ष यात्रा नागपुरात पोहोचल्यानंतर व्हेरायटी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. येथे आयोजित जाहीर सभेत विखे पाटील बोलत होते. आता कोणत्याही निवडणुका नसल्याने राजकीय हेतूने ही संघर्ष यात्रा काढलेली नाही. शेतमालाला भाव मिळावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी ही संघर्ष यात्रा असल्याचे विखे पाटील म्हणाले.