शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी महिलांना सरकार देणार १०० टक्के अनुदान; राणी दुर्गावती योजना जाहीर, लाभार्थींचा वाटा राज्य सरकार देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 12:19 IST

यापूर्वी आदिवासी महिलांसाठी केंद्रीय अर्थसंकल्प योजनांमध्ये १५ टक्के हिस्सा हा महिलांना उचलावा लागतो. आता पूर्ण १०० टक्के अर्थसाहाय्य सरकार करेल.

मुंबई : आदिवासी महिलांसाठी राज्य सरकारने राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना जाहीर केली आहे. आदिवासी समाजातील महिलांना शिक्षण, आरोग्य, प्रशासन, व्यवसाय, मत्स्यव्यवसाय, कृषी व स्वयंरोजगार यामध्ये सक्षम करणे हा याचा उद्देश आहे.

यापूर्वी आदिवासी महिलांसाठी केंद्रीय अर्थसंकल्प योजनांमध्ये १५ टक्के हिस्सा हा महिलांना उचलावा लागतो. आता पूर्ण १०० टक्के अर्थसाहाय्य सरकार करेल. ५० हजार रुपयांपर्यंतच्या अर्थसाहाय्याचा त्यात समावेश आहे. आदिवासी महिलांच्या सामूहिक योजनांसाठी ही मर्यादा ७.५ लाख रुपये इतकी असेल. केवळ आदिवासी विकास विभागच नाही तर अन्य विभागांमार्फत आदिवासी महिलांसाठी लागू असलेल्या योजनांमध्ये त्यांना आर्थिक वाटा द्यावा लागणार नाही.  अंमलबजावणीसाठी राज्य आणि जिल्हास्तरीय समित्या स्थापन केल्या आहेत.

आदिवासी महिलांना अनुदान देताना त्यांच्यावर आर्थिक भार पडणार नाही आणि त्यांची उन्नतीही साधली जाईल, असे राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनेचे स्वरूप आहे.प्रा. अशोक उईके, आदिवासी विकास मंत्री

कोण होत्या राणी दुर्गावती? राणी दुर्गावती या गोंड वंशाच्या पराक्रमी राणी होत्या. त्या कुशल प्रशासक आणि रणरागिणी होत्या. मोगल साम्राज्याने गोंड राज्यावर आक्रमण केले तेव्हा राणी दुर्गावती यांनी शौर्याने मुकाबला केला होता. त्यांचे बलिदान इतिहासात अजरामर झाले.

यासाठी मिळेल अनुदानकपडे विक्री किट, शेळी-मेंढी वाटप, गाय-म्हैस खरेदी, मत्स्यजाळे, कुक्कुटपालन, कृषी पंप आदी योजना आणि बचत गटांसाठीही ही योजना लागू होणार आहे. शिलाई मशीन, चहा स्टॉल, फुलहार आणि गुच्छ विक्री स्टॉल, ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठीचे साहित्य, भाजीपाला स्टॉल, खेळणी साहित्य, पत्रावळी बनविण्याचे यंत्र यासाठीही अनुदान दिले जाणार आहे. सामूहिक म्हणजे महिलांच्या गटाने मसाला कांडप यंत्र, आटाचक्की, मंडप साहित्य, शुद्ध पेयजल युनिट, बेकरी उत्पादने, दूध संकलन केंद्र, दुग्धजन्य पदार्थांची विक्री यासाठीही या योजनेंतर्गत अनुदान दिले जाणार आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारTrible Development Schemeआदिवासी विकास योजना