शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांपुढे सरकार सपशेल झुकले!

By admin | Updated: July 15, 2015 00:48 IST

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीने निर्माण केलेल्या प्रचंड दबावापुढे अखेर सरकारला माघार घ्यावी लागली. परिणामी याच विषयावर विधानसभेत

मुंबई : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीने निर्माण केलेल्या प्रचंड दबावापुढे अखेर सरकारला माघार घ्यावी लागली. परिणामी याच विषयावर विधानसभेत स्वत:च आणलेली चर्चा सत्ताधारी पक्षाला थांबवून सभागृह दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहापेक्षा सभागृहाबाहेर बऱ्याच घडामोडी घडल्या. अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली, पण त्यातही कोणताच तोडगा निघता नाही. कर्जमाफी देणार नाही असे आपण म्हटलेलेच नाही, असा खुलासा मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्या बैठकीत केला. हा खुलासा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी माध्यमांना सांगावा असेही ठरले. कर्जमाफीवरुन दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत गोंधळ चालू असतानाच कामकाज रेटून नेण्याच्या सरकारच्या भूमिकेवर विरोधकांनी निषेध करत बहिष्कार टाकला आणि विधानभवनातच असलेल्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याजवळ विरोधकांनी बैठक मांडली. विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा या जागेचा असा उपयोग झाला असेल. माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, छगन भूजबळ असे अनेक नेते विधानभवनात जमिनीवर बसल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि ते पाहण्यासाठी, त्यांचे फोटो काढून घेण्यासाठी तेथे गर्दी जमली. (विशेष प्रतिनिधी)अध्यक्षांच्या दालनातील बैठक निष्फळ !अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या दालनात बैठक झाली. त्यास मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह सगळे नेते होते. कर्जमाफी देणार नाही असे का बोललात, असा सवाल मुख्यमंत्र्यांना विचारला गेला. तेव्हा आपण असे बोललोच नाही, आपल्या तोंडी तसे विधान एका वृत्तपत्राने (लोकमत नव्हे) घातले, असा खुलासा फडणवीस यांनी केला. कोणताच निर्णय न होता ती बैठक संपली.