शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगड इन्स्टिट्यूटच शासनाचे देणेकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 04:45 IST

राज्याच्या समाजकल्याण विभागातर्फे सिंहगड इन्स्टिट्यूट संस्थेला सन २०१७पर्यंतच्या शिष्यवृत्तीची ५२७ कोटी रुपये रक्कम देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे - राज्याच्या समाजकल्याण विभागातर्फे सिंहगड इन्स्टिट्यूट संस्थेला सन २०१७पर्यंतच्या शिष्यवृत्तीची ५२७ कोटी रुपये रक्कम देण्यात आली आहे. उलट संस्थेने अधिकचे विद्यार्थी दाखविल्यामुळे १२२ कोटी रुपये वसूल करण्यात आले असून अजूनही ७० कोटी रुपये वसूल केले जाणार आहेत, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.सिंहगड इन्स्टिट्यूटमधील प्राध्यापकांना दीड वर्षांहून अधिक कालावधीपासून वेतन मिळाले नाही. त्यामुळे प्राध्यापकांनी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थी व पालकांनीही आंदोलनात सहभाग घेतला.सर्व राजकीय पक्ष व विद्यापीठाने हस्तक्षेप करूनही प्रश्न सुटत नसल्याने अखेर याप्रकरणी न्यायालयात दाद मागण्यात आली. न्यायालयाने सर्व प्राध्यापकांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले असून १४ मार्च रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.पुढील सुनावणीत शासन न्यायालयात काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे़ तसेच तोपर्यंत प्राध्यपांकाना कामावर रुजू करून घेणार का हेही महत्त्वाचे ठरेल़ तसेच शासनाकडून संस्थेला शिष्यवृत्तीचा निधी मिळत नसल्याने प्राध्यापकांचे वेतन दिले जात नाही; असे बोलले जात होते. परंतु, शासनाने शिष्यवृत्तीची सर्व रक्कम दिली असल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले.दलित वाड्या-वस्त्यांच्या विकासासाठी योजनासामाजिक न्याय विभागातर्फे राज्यातील ग्रामीण भागामधील दलित वाड्या, वस्त्या व पाड्यांचा सर्वांगीण विकास केला जाणार असून शासनातर्फे दरवर्षी राज्यातील मातंग समाजाच्या २५ हजार कुटुंबांना घर दिले जाणार आहे. तसेच ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वस्त्यांचा विकास’ ही योजना राबविली जाणार आहे, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी रविवारी सांगितले. राज्याच्या अर्थसंकल्पात दलित समाजासाठी कोणत्या विकास योजनांचा समावेश केला आहे. याबाबतची माहिती कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रPuneपुणे