शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांना काही झाल्यास सरकार जबाबदार ; शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2018 07:40 IST

राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर योग्य ते वैद्यकीय उपचार करण्याची मागणी विधीमंडळ अधिवेशनात करण्यात आल्यानंतर आता पक्षाचे नेते शरद पवार यांनीही

नाशिक : राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर योग्य ते वैद्यकीय उपचार करण्याची मागणी विधीमंडळ अधिवेशनात करण्यात आल्यानंतर आता पक्षाचे नेते शरद पवार यांनीही भुजबळ यांच्या प्रकृती विषयी चिंता व्यक्त करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. भुजबळ यांच्यावर योग्य उपचार व्हावेत अन्यथा काही अप्रिय घडले तर सरकारलाच जबाबदार धरण्यात येईल असा इशारा या पत्रात देण्यात आला आहे.या संदर्भातील पत्रात पवार यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून मला छगन भुजबळ यांच्या खालावत जाणा-या तब्बेतीविषयी चिंताजनक माहिती भेटत आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी ते कारागृहात खितपत पडले आहेत. छगन भुजबळ यांच्या प्रकरणात ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या विषयी अजुन माननीय न्यायालयाकडून काही निर्णय झालेला नाही. न्यायालयाकडून त्यांच्या बाबतीत अंतीम निर्णय येत नाही तो पर्यंत त्यांना निर्दोष समजण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा असे म्हटले आहे की, ‘जामीन हा नियम आहे आणि तुरूंग हा अपवाद आहे’ हे तत्व छगन भुजबळ यानाही लागू होते. त्यांना वारंवार नाकारण्यात येत असलेला जामीन दुर्देवी आहे. मला त्यावर काहीही वक्तव्य करायचे नाही. छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत. त्यांनी पन्नासहून अधिक वर्षे सामाजिक जीवनात घातली आहेत. त्यांनी मुंबईचे महापौर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम अशी पदे भुषविली आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी दिलेले योगदान अव्हेरता येणार नाही. मला जास्त काही अपेक्षा नाही पण योग्य ते वैद्यकीय उपचार त्यांना दिले गेले पाहिजेत, तो त्यांचा घटनादत्त अधिकार आहे. त्यांच्या प्रकृती विषयी आणि वाढत्या वयाविषयी तुम्ही ज्ञात आहात. मला खात्री आहे की तुम्ही त्यांना योग्य वैद्यकीय उपचार भेटावेत यादृष्टीने पावले उचलाल. मला हे खेदाने म्हणावे लागत आहे की, येत्या काळात जर छगन भुजबळ यांना एखाद्या अप्रिय परिस्थितीतून जावे लागले तर तुमच्या सरकारला यासाठी जबाबदार धरले जाईल.शरद पवार यांनी गुरूवारी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविलेले हे पत्र शनिवारी सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आले. विशेष म्हणजे त्याच दिवशी नाशिक येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या समारोपानिमित्त शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारChagan Bhujbalछगन भुजबळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस