शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

धनगर आरक्षणप्रश्नी सरकारचा प्रतिसाद थंड

By admin | Updated: July 24, 2014 23:15 IST

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचे प्रमाणपत्रच मिळावे, राज्य घटनेतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला आरक्षणाची तरतूद केली आहे.

बारामती : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचे प्रमाणपत्रच मिळावे, राज्य घटनेतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला आरक्षणाची तरतूद केली आहे. 6क् ते 65 वर्षापासून  असलेला प्रश्न प्रलंबित ठेवला आहे. पंढरपूर ते बारामती पदयात्रेनंतर मागील चार दिवसांपासून बारामतीत उपोषण आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारकडून मात्र आंदोलन कत्र्याना कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नसल्यामुळे आज दिवसभर कार्यकत्र्यामध्ये अस्वस्थता, नाराजी बरोबरच संतापाचे वातावरण होते. आज (दि. 25) पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. 
आज उपोषण कत्र्याना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.  दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास संतप्त तरुण कार्यकत्र्यानी मोर्चा काढून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. ‘कोण म्हणते देणार नाही, घेतल्या शिवाय राहणार नाही’ अशा घोषणा देत तरुणांनी बारामती शहरात हल्लाबोल केला. त्यामुळे पोलिसांची देखील धावपळ उडाली. मागील 4 दिवसांपासून 16 जण उपोषण आंदोलनाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी दिवसभर धनगर समाज बांधव शारदा प्रांगणात हजारोच्या संख्येने उपस्थित राहत आहेत. 
चार दिवसांपासून चाललेल्या आंदोलनात अद्याप राज्य शासनाच्या कोणत्याही अधिकृत प्रतिनिधीने, मंत्र्यांनी भेट दिलेली नाही. त्यामुळे आज कार्यकत्र्यामध्ये संताप, नाराजी, अस्वस्थता असल्याचे चित्र दिसून आले. याच नाराजीतून अचानक दुपारी रासपचे जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे, सनी देवकाते आणि इतरांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे पोलिसांची देखील पळापळ झाली. शहरातून घोषणा देत मोर्चा पुन्हा शारदा प्रांगणात आल्यावर ज्येष्ठ नेते गुलाबअप्पा देवकाते, गणपतआबा देवकाते, अविनाश मोटे, वसंत घुले यांनी शांततेचे आवाहन केले. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले. 
दरम्यान, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी आंदोलनाला बारामतीत येऊन पाठिंबा दिला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. शिवसेना आमदार  विजय शिवतारे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांवर  टिका केली. 
राष्ट्रवादीच्या बारामतीच्या नेत्यांनी समाज घटकांना मागील 4क् ते 45 वर्षापासून झुलवत ठेवले आहे. मग तो पाण्याचा प्रश्न असो अथवा त्यांच्या हक्काच्या आरक्षणाचा प्रश्न असो. केवळ त्यांच्या मतावर राजकारण करायचे मात्र, त्यांच्या मागण्या पूर्ण करायच्या नाहीत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनीही मार्गदर्शन केले. तसेच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरून आंदोलनाला पाठिंबा दिला. 
आज दुपारी राज्य सरकारच्या स्तरावर झालेल्या घडामोडींची माहिती आमदार प्रकाश शेंडगे यांनी उपोषणाला बसलेले पांडुरंग मेरगळ यांना दिली. त्यांचे बोलणो स्पीकरवर ऐकवण्यात आले. त्यावर मेरगळ यांनी ‘बाबा, दादाला आमचे गा:हाणो ऐकण्यास वेळ नसेल, आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यास पुढाकार घेत नसतील तर उद्यापासून आमचाही हिसका दाखवू’ असा इशारा दिला. 
यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी 8 दिवसांची मुदत मागितली होती.  25 तारखेच्या अगोदर आरक्षणाच्या प्रश्नी निर्णय घेण्यात येईल. 
आज निर्णय अपेक्षित होता. बुधवारी या प्रश्नी चर्चा झाली. मात्र, आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, क्रीडा मंत्री पद्माकर वळवी या आदिवासी नेत्यांनी आरक्षणाला विरोध केला. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या धनगर समाज बांधवांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज (दि. 25) रोजी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आरक्षण कृती समितीची बैठक आयोजित केली आहे. त्यानंतर पत्रकार परिषदेत निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष हनुमंत सुळ, ज्येष्ठ नेते बाळासाहेब गावडे यांनी दिली. (प्रतिनिधी)
 
बारामतीला पोलीस 
छावणीचे स्वरूप
दरम्यान आरक्षण आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर बारामतीला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. जवळपास 6क्क् हून अधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, सहाय्यक प ोलीस निरीक्षक या अधिका:यांसह वरिष्ठ अधिकारी देखील या आंदोलनावर लक्ष ठेवून आहेत. बारामतीतील राष्ट्रवादीचे कार्यालय, माजी मंत्री शरद पवार यांचे निवासस्थान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थान परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच, तालुक्यातील मोठय़ा गावांमध्ये देखील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलिसांच्या बळावर आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी भावना कार्यकत्र्यामध्ये  आहे.
 
मधुकर पिचड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्य़ाचे दहन 
कळस : कळस (ता. इंदापूर) येथे धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणास विरोध करणा:या अदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्य प्रतिकात्मक पुतळ्य़ाचे दहन करण्यात आले.  
पंढरपूर ते बारामती संघर्ष पदयात्रेनंतर बारामती येथे सध्या सुरू असलेल्या उपोषण आणि धरणो आंदोलनाला ग्रामस्थांनी  पाठिंबा दिला आहे. घटनेने दिलेल्या अनुसूचित जमातीचे आरक्षण राज्य शासनाने द्यावे यासाठी बुधवारी मंत्रीमंडळाच्या बैठकी दरम्यान चर्चा झाली यावेळी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांच्या सहका:यांनी धनगर समाजाला अनुसूचीत प्रवर्गात आरक्षण देण्यास विरोध केला. त्यामुळे धनगर समाजातून त्यांच्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे गुरूवार (दि.24 ) रोजी कळस येथे मधुकर पिचड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्य़ाचे दहन करून पिचड यांच्या विरोधात घोषणा दिल्या. 
तसेच धनगर समाजाला तातडीने आरक्षण देण्याची मागणी यावेळी कळस येथील धनगर समाजाने केली आहे. यावेळी कर्मयोगी कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील, संग्राम पाटील, रणजित पाटील, अमरजीत पाटील, विजय खर्चे, दादा वायाळ,पप्पू पाटील, बाळासाहेब खारतोडे, गणोश खारतोडे, सुखदेव खारतोडे, माऊली खारतोडे आदी उपस्थित होते.