शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय जमिनींच्या विक्रीची चौकशी

By admin | Updated: August 6, 2016 04:58 IST

परस्पर विक्री करुन शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडविण्याच्या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने त्याची उच्चस्तरीय सखोल चौकशी करण्यात येईल

मुंबई : मुंबई शहरातील लिज संपलेल्या शासकीय जमिनी खोटे कागदपत्रे सादर करुन परस्पर विक्री करुन शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडविण्याच्या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने त्याची उच्चस्तरीय सखोल चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. या प्रकरणाची पाळेमुळे थेट मंत्रालयापर्यंत पोहचली असून यात खूप मोठा घोटाळा झाला असल्याने कोणालाही सोडणार नाही, असा इशाराही मंत्री पाटील यांनी दिला. केवळ प्रश्नांकित जमिनीची विक्री करुन महसूल बुडविलेला नसून १२५० मिळकतींचे व्यवहार अशा प्रकारे झाले आहेत. त्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे. लिजवरील जमिनी विकता येत नाहीत. २०१३ पासून साध्या कागदावरुन अमलगमेशनच्या माध्यमातून मुंबईतील सुमारे ८०० जमिनी विक्री करण्याचे प्रकार घडले आहेत. खूप मोठा घोटाळा यात झाला आहे. पाच प्रकरणाची जिल्हाधिकारी स्तरावर चौकशी करण्यात आली होती. त्यावरुन या प्रकरणाची पाळेमुळे मंत्रालयापर्यंत पोहचली आहेत. म्हणूनच त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, असे महसूल मंत्री पाटील यांनी सांगितले. यावेळी गणपतराव देशमुख यांनी चौकशीचे स्वरुप स्पष्ट करण्याची मागणी केली तर योगेश सागर यांनी याच प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशामार्फत करण्याची मागणी केली.>लोअर परेल येथील मिलची जमीनमुंबईतील लोअर परेल येथील शापूरची भरुचा मिल्सचा भाडेपट्टा संपुष्टात आलेली जमीन मूळ मालकाने तीन ग्राहकांना अवैधरित्या हस्तांतरीत करताना ३०० कोटी महसूलाचे नुकसान केल्याचा मुद्दा आशिष शेलार यांनी उपस्थित केला होता.