शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

समन्यायी पाण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा

By admin | Updated: August 15, 2016 04:29 IST

गोदावरी नदीला काही भागात पूर आला म्हणून जायकवाडी धरण ६० टक्क्यांवर भरले.

नांदेड : यंदा तुलनेने चांगला पाऊस झाला, त्याचे समाधान आहे. गोदावरी नदीला काही भागात पूर आला म्हणून जायकवाडी धरण ६० टक्क्यांवर भरले. तरीही मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांवर असलेले पाणी टंचाईचे संकट कायमचे दूर करण्यासाठी समन्यायी पाणी वाटप झाले पाहिजे. त्याकरिता राज्य सरकारने विधायक हस्तक्षेप करावा, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शनिवारी येथे मांडली.‘लोकमत’आयोजित नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील ५० प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सन्मान सोहळ्यात ते म्हणाले, जायकवाडीच्या वरच्या भागात पूर आला. त्यानंतर मराठवाड्याकडे पाणी आले. एकीकडे वरच्या भागात पाणी अडविले जाते तर मराठवाड्यातून पुढे जाणारे पाणी बाभळीसारख्या बंधाऱ्यातही थांबविता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे २९ आॅक्टोबरपर्यंत दरवाजे बंद करता येत नाहीत. परिणामी आलेले पाणी वाहून जाते. याच बंधाऱ्यासाठी महाराष्ट्र व आंध्र प्रदेशमध्ये तंटा झाला. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. आता पुन्हा मराठवाड्याच्या न्याय्य हक्कासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले पाहिजे. एकूणच सरकारने समन्यायी पाणी वाटपासाठी योग्यवेळी हस्तक्षेप करावा अन्यथा पाणीप्रश्न पेटेल, असा इशाराही त्यांनी दिला.मराठवाड्यातील काही मोठे प्रकल्प अद्यापही भरलेले नाहीत. विष्णूपुरीत पाणी आले असले तरी लोकसंख्येच्या प्रमाणात दीर्घकाळ पूर्तता होणार नाही. त्यामुळे जिल्हा- शहरांसाठी पर्यायी पाणी पुरवठ्याच्या योजना आखल्या तरच शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळेल, असेही त्यांनी सांगितले.सध्या देशात स्टार्टअप इंडिया, स्टॅन्डअप इंडिया सुरू आहे, परंतु हे सर्व काही मोजक्या व मोठ्या शहरांपुरतेच मर्यादित आहे. दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारला सवडच नाही. बँका जवळ उभे करीत नाहीत. कर्जाचे पुनर्गठन होत नाही, असेही ते म्हणाले़ (प्रतिनिधी)>लोकांची नाडी जाणणारे ‘लोकमत’मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या वेदना पाहिल्या. विवंचनेला वैतागून ज्यांनी आत्महत्येसारखा शेवटचा मार्ग पत्करला. त्यांची व त्यांच्या कुटंबीयांची निश्चितच आठवण होते, असे नमूद करीत खा. चव्हाण म्हणाले, दुष्काळाचे दुष्टचक्र भेदून ज्या शेतकऱ्यांनी नावीन्यपूर्ण प्रयोग केले त्यांचा ‘लोकमत’ने सन्मान केला.त्यामुळे मनोबल उंचावेल. प्रेरणा मिळेल, इतर शेतकऱ्यांना दिशा मिळेल. समाजाची नाडी जाणणारे ‘लोकमत’च हे करु शकते, असेही चव्हाण म्हणाले.