शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय रुग्णालये अग्निशामक उपकरणाविना

By admin | Updated: July 7, 2014 23:38 IST

जिल्हाभरातील बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आग प्रतिबंधात्मक उपकरणे बसविण्यात आली नाही.

कारंजालाड: जिल्ह्यातील कारंजा,मानोरा, मंगरुळपीर, मालेगाव ,रिसोड, कामरगाव , अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालयांप्रमाणेच जिल्हाभरातील बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आग प्रतिबंधात्मक उपकरणे बसविण्यात आली नाही. काही ठिकाणी अशी उपकरणे बसविले होती.मात्र , ती उपकरणे अनेक वर्षापासून धुळखात पडून आहेत.राज्यात अनेक ग्रामीण रुग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंद्रात अशीच स्थिती असल्याची माहिती आहे.त्यामुळे आरोग्य विभाग रुग्णांच्या सुरक्षेबाबत किती गंभीर आहे ते दिसून येते.ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक अरोग्य केंद्रांमध्ये मोठय़ा प्रमाणावर नागरिक उपचारासाठी येतात.त्यांना तेथे उपचार, शस्त्रक्रिया आदींसाठी भरती व्हावे लागते.त्यामुळे ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अग्निशामक उपकरणे सज्ज असणे रुग्ण व आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यावश्यक ठरते.परंतु, याकडे आरोग्य यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.कारंजा ग्रामीण रुग्णालयात कारंजा, मानोरा, मंगरुळपीर तालुक्यातून बरेच रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. रुग्णालयात नेहमीकरीता ३0 रुग्ण भरती राहतात.तसेच दररोज ओ.पी.डी.मध्ये ३0 ते ४0 रुग्ण उपचार घेतात. रुग्णालयात शासकीय व निमशासकीय ६0 कर्मचारी कामावर असतात. यासोबतच रुग्णाचे नातेवाईक २0 पेक्षा जास्त उपस्थित असतात. येथे ७ जुलै रोजी पाहणी केली असता कारंजा ग्रामीण रुग्णालयात अग्निशामक उपकरणे नसल्याचे आढळून आले.रिसोड ,अनसिंग,मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयात अग्निशामक उपकरणे नाहीत.कामरगाव व मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात अग्निशामक उपकरणे आहेत.परंतु, ती धुळ खात पडून आहेत. जिल्ह्यात २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत.पण ,त्यापैकी कुठेही अग्निशामक उपकरणे बसविलेली नाहीत. या रुग्णालयांमध्ये व प्राथमिक आरोग्य केंद्रात अचानक आग लागल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कसलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. कारंजा ग्रामीण रुग्णालयात एका वर्षापुर्वी शस्त्रक्रिया विभागात आग लागली होती. यामध्ये १५ ते २0 हजार रुपयाचे नुकसान झाले होते. मात्र ग्रामीण रुग्णालयात लागलेल्या आगीच्या ठिकाणी गॅस सिलेंडर व ऑक्सीजनचेही सिलेंडर ठेवलेले होते. मात्र, कर्मचार्‍यांच्या सतर्कमुळे मोठा अनर्थ टळला.तसे शासनाने सर्वच शासकीय कार्यालयांचे फायर ऑडीट करुन आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे रुग्ण व आरोग्य कर्मचारी असुरक्षित आहेत.