अहमदनगर : जिल्हा परिषद निवडणुकीच्या दरम्यान विषारी दारू प्यायल्यामुळे पांगरमलसह दरेवाडी, कौडगाव येथील १४ जणांचा मृत्यू झाला. त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी एक लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. मागील महिन्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पांगरमल (ता. नगर) येथे विषारी दारू पिल्यामुळे नऊजणांचा मृत्यू झाला. त्याच घटनेतील १२जण अजूनही अत्यवस्थ आहेत. त्याचवेळी नगर तालुक्यातील दरेवाडी, कौडगाव व बाबूर्डी येथील पाच जणांचा विषारी दारूसेवनामुळे मृत्यू झाला. दारूमुळे पंधरा दिवसांच्या दरम्यान झालेल्या १४ मृत्यूंमुळे जिल्हा हादरून गेला होता. मृतांना सरकारी मदतीची मागणी नातेवाइकांनी केली होती. (प्रतिनिधी)
दारूकांडातील मृतांना सरकारी मदत
By admin | Updated: March 5, 2017 00:59 IST