शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

साठेबाजांसमोर सरकार हतबल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2016 06:16 IST

तूरडाळ मोठ्या प्रमाणावर बाजारात येत असताना आणि आफ्रिकेच्या वायदेबाजाराचा एका किलोसाठीचा दर ६० रुपये असतानाही महाराष्ट्रात तूरडाळीचे किरकोळ दर कमी करण्यास

- अतुल कुलकर्णी, मुंबई

तूरडाळ मोठ्या प्रमाणावर बाजारात येत असताना आणि आफ्रिकेच्या वायदेबाजाराचा एका किलोसाठीचा दर ६० रुपये असतानाही महाराष्ट्रात तूरडाळीचे किरकोळ दर कमी करण्यास व्यापारी तयार नाहीत, साठेबाजही सगळ्याच डाळींचे साठे करीत असूनही राज्य सरकार साठेबाजांपुढे हतबल झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे तूरडाळीऐवजी वाटाण्याची डाळ मुबलक प्रमाणात व स्वस्त दरात उपलब्ध असल्याने तिचा वापर करण्यावर भर देण्याचे अन्न व पुरवठा विभागाने ठरविले आहे.काट्याने काटा काढायचा, या न्यायाने ‘पिवळा वाटाणा स्पील्ट’ या नावाने ओळखली जाणारी डाळ होलसेल बाजारात ३० रुपये किलो तर किरकोळ बाजारात ४० रुपये किलोने विकली जात आहे. त्यामुळे तसा फार फरक दोन्हीतील प्रथिनांमध्ये नाही. मात्र तूरडाळ खुल्या बाजारात १२५ रुपये तर काही मॉलमध्ये १८० रुपये दराने विकली जात आहे. त्याचवेळी पिवळ्या वाटाण्याची टरफले काढलेली डाळ ४० ते ४५ रुपये किलोने विकली जात आहे. त्यामुळे हीच डाळ जनतेने जास्तीत जास्त वापरावी, असा प्रसार आणि प्रचार वाढवण्याचे धोरण हा विभाग आखत आहे. सिंधुदुर्गातील तूरडाळ रोखलीवेंगुर्ल्यातील दक्षता पथकांनी खराब तूरडाळीचे नमुनेच मंत्रालयात आणले. त्यानंतर मंत्री गिरीश बापट यांनी पुरवठा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचेही आदेश दिले. हा माल शिवशक्ती डाळ इंडस्ट्रीज, गुलबर्गा यांनी पाठवला होता. ज्या रेशन दुकानात तूरडाळ पोहोचली, तेथे तिचे वाटप थांबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. सरकारच्या दक्षता समित्या काही ठिकाणी चांगले काम करत आहेत, तर काही ठिकाणी त्यांच्याकडूनही ‘आमचे काय’ अशी विचारणा सुरू झाल्याच्या तक्रारीही येत आहेत.पुरेशी डाळ उपलब्धसरकारने नॅशनल कमॉडिटी स्टॉक एक्सचेंजकडे दर महिन्याला ७ हजार मेट्रिक टन तूरडाळ रेशन दुकानांसाठी मागविली आहे. खुल्या बाजारासाठी ४ हजार मेट्रिक टन तूरडाळही येईल. गेल्या चार दिवसांत मुंबई, ठाणे, पुणे, लातूर, नागपूर, अकोला या प्रमुख बाजारपेठांत १५,८३५ क्विंटल तूरडाळ विक्रीसाठी आली आहे. मोठ्या प्रमाणात डाळ येत असूनही नफेखोरीसाठी ती दडवून ठेवणाऱ्या मॉलवर धाडी घालण्याची तयारी सुरू आहे. धाडीत कोणते मोठे मासे यात सापडतात यावर बरेच अवलंबून आहे. प्रत्येक १०० ग्रॅम डाळीत प्रथिनांचे प्रमाणमसूर २६ ग्रॅमचणाडाळ२५.४ ग्रॅमउडीद२४ ग्रॅममूग२३.८६ ग्रॅमतूरडाळ२२.३ ग्रॅमपिवळा वाटाणा२०.० ग्रॅमकाळा वाटाणा१२ ग्रॅमहरभरा१३ ग्रॅम