मुंबई : अपंग प्रवाशांसाठी असलेल्या राखीव डब्यातून प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेकडून कठोर कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे. १ फेब्रुवारीपासून विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून आतापर्यंत ८00 प्रवाशांवर कारवाई झाल्याची माहिती देण्यात आली. यामध्ये ६0 जण सरकारी कर्मचारी आहेत. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये मुंबई महापालिकेचे दोन, लोहमार्ग पोलीस सेवेतील २0 आणि २५ हून अधिक जणांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला. ज्या कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या संबंधित विभागांना पत्र पाठवून समज देण्याची विनंती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
अपंगांच्या डब्यात सरकारी कर्मचारी
By admin | Updated: February 16, 2017 04:59 IST