शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीसाठी शासनाचा निर्णय;१३ हजार महिलांची नोकरी जाणार, सेविकांची सेवासमाप्ती ६०व्या वर्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 03:18 IST

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या सेवासमाप्तीचे वय ६५वरून ६० करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

विश्वास पाटील कोल्हापूर : अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या सेवासमाप्तीचे वय ६५वरून ६० करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासंबंधीचा आदेश २३ फेब्रुवारीस महिला व बालविकास विभागाने काढला असून, त्याविरोधात अंगणवाडी तार्इंतून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. नव्या आदेशामुळे राज्यातील सुमारे १३ हजारांहून अधिक अंगणवाडी कर्मचाºयांना १ एप्रिलपासून घरी जावे लागणार आहे.अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनामध्ये दरवर्षी वेतनवाढीप्रमाणे वाढ करण्याची शासनास शिफारस करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सेविकांच्या संघटनेच्या पदाधिकाºयांचा समावेश असलेली समिती २० जुलै २०१६च्या निर्णयान्वये स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने ९ मार्च २०१७ रोजी अहवाल दिला. त्यात सेवासमाप्तीचे वय कमी करण्याची शिफारस केली. त्यानुसार वय कमी केल्याचे शासनाचे म्हणणे आहे. राज्य शासनाने आमच्यात मानधनात वाढ केली आणि सेविकांची नोकरीही काढून घेतली. याविरोधात आम्ही पुन्हा आंदोलनाची हाक देणार असल्याचे महाराष्ट्र राज्य पूर्वप्राथमिक सेविका व अंगणवाडी कर्मचारी महासंघांच्या जनरल सेक्रेटरी सुवर्णा तळेकर यांनी सांगिले.