शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची कर्जमाफी फसवी, शेतक-यांमध्ये भेद निर्माण करणारी: राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 04:59 IST

महाराष्ट्रातील सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी असून, शेतक-यांमध्ये भेद निर्माण करणारी आहे. सरसकट कर्जमाफीसाठी आम्ही सरकारला भाग पाडू

परभणी : महाराष्ट्रातील सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी असून, शेतक-यांमध्ये भेद निर्माण करणारी आहे. सरसकट कर्जमाफीसाठी आम्ही सरकारला भाग पाडू, अशी ग्वाही काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी शेतक-यांना दिली.पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय आणि शेतक-यांशी खा. गांधी यांनी आस्थेवाईक संवाद साधला.या कार्यक्रमासाठी छोटेखानी मंच उभारला होता. सुरुवातीला १३ शेतक-यांनी खा. गांधी यांचा सत्कार केला. त्यानंतर एरंडेश्वर येथील शेतकरी बालासाहेब काळे यांनी शेतकºयांच्या अडचणी मांडण्यास सुरुवात केली. राज्य शासनाने दिलेली कर्जमाफी फसवी आहे, कर्जमाफीच्या अर्जांसाठी अनेक अडचणी येत आहेत. दररोज नवा जी.आर. निघत असून, नवीन कर्ज मिळत नाही. जुन्या कर्जांची माफी होत नाही, या परिस्थितीमुळे शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहेत, असे सांगितले.शेतकरी आपल्या समस्या मांडत असतानाच खा. गांधी अचानक मंचावरून उठले, सुरक्षेच्या दृष्टीने तयार केलेल्या लाकडी कठड्यामधून थेट समस्या मांडणाºया शेतकºयांमध्ये येऊन मांडी घालून बसले. त्यानंतर शेतकºयांचा उत्साह आणखीच वाढला. एक-एक करीत शेतकरी गाºहाणे मांडत होते. प्रा. व्यंकटराव काळे, अण्णासाहेब काळे, राजू काळे आदींनी राज्य शासनाकडून अडवणूक होत असल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी खा. राहुल गांधी यांनी शेतकºयांना अनेक प्रश्न विचारले. त्यात तातडीचे १० हजार रुपये मिळाले का, गावाची लोकसंख्या किती आहे आणि किती जणांना कर्जमाफी झाली, असे प्रश्न करताच गावक-यांनी एकालाही कर्जमाफी मिळाली नसल्याचे सांगितले. त्यानंतर खा. राहुल गांधी यांनी राज्य सरकारने केलेली कर्जमाफी फसवी असून, संपूर्ण कर्जमाफी देण्यास शासनाला भाग पाडू, असे अभिवचन दिले. शेतक-यांशी संवाद साधल्यानंतर राहुल गांधी यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांशीही संवाद साधून त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीFarmerशेतकरी