शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय आयुर्वेदिक कॉलेजातील प्रवेशबंदी उठली, आजपासून प्रवेश सुरू; लोकमतच्या बातमीनंतर हलली यंत्रणा 

By संतोष आंधळे | Updated: November 23, 2022 08:20 IST

विद्यार्थ्यांना या महाविद्यालयांत प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे बुधवारपासून या महाविद्यालयात प्रवेश सुरू होणार आहेत.

मुंबई : वैद्यकीय शाखेच्या प्रवेश प्रक्रिया सुरू असताना,  भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाने राज्यातील पाच शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयांत प्रवेशबंदी केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना या महाविद्यालयात प्रवेश घेता येऊ शकत नव्हता. त्यानंतर, वैद्यकीय शिक्षण विभागाने ज्या कारणांकरिता बंदी घातली होती. त्या कारणांची काही दिवसांत पूर्तता केली. अखेर अटी-शर्तीसह त्या महाविद्यालयांवरील प्रवेशबंदी उठली आहे.

विद्यार्थ्यांना या महाविद्यालयांत प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे बुधवारपासून या महाविद्यालयात प्रवेश सुरू होणार आहेत. ‘पाच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयांत प्रवेशबंदी’ अशी बातमी ‘लोकमत’ने ३१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर, प्रवेशबंदीचा नियमित मागोवा घेण्यात आला. 

लोकमतच्या बातमीनंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला होता, तसेच त्यांचे वेतन दुपटीने वाढविले, तसेच क आणि ड संवर्गातील रिक्त पदे भरण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना संशोधनासाठी पशुगृह लागते, त्यासाठी महाविद्यालयाजवळील पशुगृहासोबत संलग्न करून घेतले आहे. 

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या आयुष संचालनालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी उशिरा भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाने प्रवेशबंदी उठविल्याचे पत्र पाठविले. त्यामध्ये त्यांनी काही अटी आणि शर्ती पूर्ण करण्यास सांगितले आहे. त्याची पूर्तता येत्या काळात करावी लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी मुलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे बुधवारपासून विद्यार्थी प्रवेश घेऊ शकणार आहे. मुंबई, जळगाव, नांदेड, नागपूर आणि उस्मानाबाद येथील महाविद्यालयांचा यात समावेश आहे. 

कायमस्वरूपी पदे भरण्याची मागणी - नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) या आयुर्वेदिक आणि युनानी डॉक्टरांच्या संघटनेने  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून प्रवेशबंदी उठविण्याची मागणी केली होती. - या संघटनेत राज्यातील एक लाख डॉक्टरांचा समावेश आहे. या संघटनेच्या विद्यार्थी फोरमचे सरचिटणीस डॉ.राहुल राऊत यांनी सांगितले की, शासनाने प्राध्यापकाची पदे कंत्राटी स्वरूपात भरण्यापेक्षा ती कायमस्वरूपी भरावी.- त्यामुळे भविष्यात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, तसेच ज्या अटी-शर्ती आयोगाने सांगितल्या आहेत, त्याची वेळेत पूर्तता करावी.

टॅग्स :Medicalवैद्यकीयStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयdoctorडॉक्टर