शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना पाठीशी घालण्यासाठी सरकारी वकिलांना हटविले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 01:41 IST

ख्याजा युनूस कोठडी मृत्यूप्रकरणातील केसमधील विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती चार पोलिसांना पाठीशी घालण्याकरिता रद्द करण्यात आली नाही, असा दावा राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयात केला.

मुंबई : ख्याजा युनूस कोठडी मृत्यूप्रकरणातील केसमधील विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती चार पोलिसांना पाठीशी घालण्याकरिता रद्द करण्यात आली नाही, असा दावा राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयात केला.अ‍ॅड. दीपक मिरजकर यांना ख्वाजा युनूस कोठडी मृत्यूप्रकरणातील केसमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी निवृत्त पोलीस अधिकारी प्रफुल भोसले व अन्य तीन पोलिसांना समन्स बजावून या केसमध्ये हत्येप्रकरणी आरोपी करण्याची व त्यांच्यावरही खटला चालविण्याची विनंती सत्र न्यायालयाला केली होती. त्यांनी तसा अर्ज सत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर एप्रिलमध्ये राज्य सरकारने अधिसूचना काढून त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती रद्द केली.या खटल्यातील महत्त्वाचा साक्षीदार मोहम्मद अब्दुल मतीन याने सत्र न्यायालयात साक्ष देताना म्हटले होते की, घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी युनूस याला भोसले, तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक हेमंत देसाई व अन्य दोन पोलीस मारहाण करत असताना आपण पाहिले. त्याच्या साक्षीनंतर सरकारी वकिलांनी पोलिसांना आरोपी करण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला.विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती रद्द केल्याने युनूसची आई आसिया बेगम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. संबंधित पोलिसांना पाठीशी घालण्यासाठी राज्य सरकारने विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती रद्द केल्याचा आरोप आसिया बेगम यांनी केला आहे. महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी आसिया बेगम यांचा आरोप फेटाळला. ‘चार पोलिसांना वाचविण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला नाही. मांजरेकर यांनी राज्य सरकारच्या मताविरुद्ध जाऊन अर्ज दाखल केल्याने त्यांची नियुक्ती रद्द केली. राज्य सरकारने याआधीच चारही पोलिसांवर कारवाई करण्यास मंजुरी देण्यास नकार दिला होता,’ असे कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले.‘सरकारने पोलिसांवर कारवाई करण्यास परवानगी देण्यास नकार दिल्याने आसिया यांनी उच्च न्यायालयात याचिका केली. उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली व राज्य सरकारचा निर्णय योग्य ठरविला. त्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सध्या हा अर्ज सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तरीही मांजरेकर यांनी सत्र न्यायालयात चारही आरोपींना आरोपी करण्यासाठी अर्ज केला,’ अशी माहिती कुंभकोणी यांनी न्या. आर. एम. सावंत व न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाला दिली.न्यायालयाने आधीच्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की, या चारही आरोपींविरोधात पुरावे नाहीत. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सत्र न्यायालयाला सीआरपीसी ३१९ अंतर्गत असलेल्या अधिकारावर अंकुश बसला आहे,’ असे न्यायालयाने शुक्रवारच्या सुनावणीत स्पष्ट केले. मांजरेकर यांना आणखी एक संधी द्या. ते स्वत:हून अर्ज मागे घेतीलही, असेही न्यायालयाने म्हटले.२००२ घाटकोपर बॉम्बस्फोटप्रकरणी ख्वाजा युनूसला (२७) अटक करण्यात आली. त्याला चौकशीसाठी औरंगाबादला नेत असताना तो पळून गेला, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, त्याच्या आईने याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याचा आदेश दिला. ख्वाजा युनूस पळून गेला नसून पोलीस कोठडीत त्याचा मृत्यू झाल्याचे सीआयडी चौकशीतून उघडकीस आले.

टॅग्स :Courtन्यायालय