शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणात मिळाला ‘गोपीनाथांचा’ आशीर्वाद- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 10:51 IST

गहिनीनाथ गडाचा आराखडा मंजूर; लवकरच विकासकामे करू

लोकमत न्यूज नेटवर्क

गहिनीनाथ गड (जि. बीड):  नाथ संप्रदायातील गडावर येऊन नाथांचा आशीर्वाद तर मिळालाच. पण त्याचबरोबर ‘गोपीनाथांचा’देखील आशीर्वाद मिळाला आहे. गहिनीनाथ गडावरील प्रलंबित आराखडा लवकर मंजूर करून सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गड येथील संत वामनभाऊ महाराज यांच्या ४७वा  पुण्यतिथी सोहळा रविवारी पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी  व्यासपीठावर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी आमदार साहेबराव दरेकर,  माजी आमदार भीमराव धोंडे, आ. सुरेश धस, आ. बाळासाहेब आजबे, आ. लक्ष्मण पवार, आ. मोनिका राजळे, आ. नमिता मुंदडा,  अक्षय मुंदडा, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के आदींची उपस्थिती होती.

फडणवीस म्हणाले, हा ध्वज नव्हे ही जबाबदारी माझ्यावर दिली आहे. महाराज आपला आणि गडाचा सेवेकरी म्हणून काम करेल. नाथांचा आशीर्वाद  घेण्यासाठी गडावर आलोय. नाथांचा तर आशीर्वाद मिळालाच; पण राजकारणात ‘गोपीनाथांचा’ आशीर्वाद मला मिळाला. गडाचा मंजूर केलेला आराखडा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.

पंकजा मुंडेंची दुसऱ्यांदा गैरहजेरी

गहिनीनाथ गडावरील श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवास भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची गैरहजेरी होती. गेल्या १५ दिवसांत बीड जिल्ह्यात फडणवीस हे दोन वेळा येऊन गेले. त्यांच्या दोन्ही कार्यक्रमांत बीडच्या दोन्ही ताईंची गैरहजेरी मात्र राजकीय गोटात चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान, गडावरील कार्यक्रमाला मुंडे या आजारी असल्याने येऊ शकल्या नाहीत, असे समजते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGopinath Mundeगोपीनाथ मुंडे