शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गोपीला प्रेयसी गमविल्याचे दु:ख

By admin | Updated: November 16, 2014 00:43 IST

नक्षल चळवळीतील १५ वर्षांत अनेक हिंसक कारवाया करून नक्षल्यांचा विश्वास संपादन करणाऱ्या दलम कमांडर गोपीला वरिष्ठ नक्षल्यांकडून वेळोवेळी त्रास दिला जात होता. त्याच्यावर संशय व्यक्त केला

वरिष्ठ नक्षलवाद्यांकडून अनन्वित छळ : गोपीने सांगितली आपबितीगडचिरोली : नक्षल चळवळीतील १५ वर्षांत अनेक हिंसक कारवाया करून नक्षल्यांचा विश्वास संपादन करणाऱ्या दलम कमांडर गोपीला वरिष्ठ नक्षल्यांकडून वेळोवेळी त्रास दिला जात होता. त्याच्यावर संशय व्यक्त केला जात होता. कोरची तालुक्यातील बेतकाठी येथील पोलीस चकमकीत त्याची प्रेयसी शामको ही ठार झाली. या घटनांमुळे त्रस्त गोपीने ११ नोव्हेंबर रोजी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असल्याची माहिती गोपीने पोलिसांना दिली. गडचिरोली, गोंदियासह छत्तीसगडच्या सीमा भागात मागील अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्या गोपी ऊर्फ निरंगसाय मडावी या जहाल नक्षलवाद्याने कुरखेडा तालुक्यातील सावरगावजवळच्या जंगलात एका सहकाऱ्याच्या माध्यमातून पोलिसांसमोर ११ नोव्हेंबर रोजी आत्मसमर्पण केले. गोपी हा मूळचा कोरची तालुक्यातील असून २००२ मध्ये त्याने नक्षल चळवळीत प्रवेश केला. सुरूवातीला दलम सदस्य म्हणून काम करताना त्याने हळूहळू वरिष्ठ नक्षलवाद्यांचा विश्वास संपादन केला. हिंसक कारवायांमध्ये निपुण आणि दिलेली जबाबदारी न चुकता पार पाडीत असल्याने त्याला दलम कमांडर म्हणून बढती देण्यात आली. एवढेच नव्हे, तर तो विभागीय समितीचा सदस्यसुद्धा होता. दरम्यान, गोपीची शामको ऊर्फ शांता कोरचा रा. तोडसापेढा ता. एटापल्ली हिच्यासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. शामकोच्या प्रेमात पडलेल्या गोपीचे चळवळीतील कारवायांवर लक्ष लागेनासे झाले. याची माहिती वरिष्ठ नक्षलवाद्यांना मिळाली. गोपीवर पाळत ठेवण्यास सुरूवात झाली. त्याचे एकेकाळचे सहकारी असलेले नक्षली त्याच्यावर संशय घेऊ लागले.नक्षलवाद्यांच्या केंद्रीय कमिटीचा सदस्य व महाराष्ट्राचा सचिव मिलिंद तेलतुंबडे याने गडचिरोली-गोंदिया डिव्हीजनचा डिव्हीजनल कमांडर पहाळसिंग याला २८ जून २०१३ रोजी पत्र लिहून गोपी व शामकोच्या प्रकरणाची माहिती दिली. हे पत्र पोलिसांच्या हाती लागले आहे. गोपी व शामकोला एकत्र ठेवू नये, गोपीला नक्षल कारवायांसाठी पुन्हा सक्षम करणे आवश्यक आहे. त्याला एकट्याला कारवाईवर पाठवू नका, त्याच्यावर विशेष नजर ठेवा, असे पत्रात म्हटले आहे. पत्रानुसार गोपी व शामकोला वेगवेगळे ठेवण्यात आले. वरिष्ठांच्या या कृतीमुळे गोपी व शामको दोघांच्याही मनात नक्षल चळवळीविषयी प्रचंड संताप निर्माण झाला होता. त्यातच १७ फेब्रुवारी २०१४ रोजी गडचिरोली-गोंदिया सीमेवर असलेल्या कोरची तालुक्यातील बेतकाठी येथील पोलीस चकमकीत शामको ठार झाली. यामुळे गोपी पूर्णपणे हतबल झाला. एकीकडे जीवापाड प्रेम करणारी प्रेयसी गेली आणि दुसरीकडे वरिष्ठांकडून त्रास देण्याचे प्रकार वाढीस लागले.