शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

गोपाळकाल्याने आषाढीची सांगता

By admin | Updated: July 20, 2016 05:40 IST

‘ज्ञानेश्वर माउली, तुकाराम’च्या गजरात गोपाळपुरात सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या आणि गोपाळकाल्याने आषाढी वारीची सांगता झाली.

सचिन कांबळे,

पंढरपूर- ‘ज्ञानेश्वर माउली, तुकाराम’च्या गजरात गोपाळपुरात सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या आणि गोपाळकाल्याने आषाढी वारीची सांगता झाली. गोपाळ काला गोड झाला। गोपाळाने गोड केला ॥ या जयघोषात गोपाळपूर दुमदुमून गेले होते. पालख्यांनी गोपाळकाला गोड केल्यानंतर मानाच्या सात पालख्या श्रीविठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदिरात आल्या. आषाढी वारीच्या सोहळ्यात विठ्ठल दर्शनाची आस पूर्ण झाल्यानंतर, या पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. तत्पूर्वी मंदिर समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी संजय तेली यांच्या हस्ते पादुकांचे पूजन व मानाच्या पालख्यांच्या मानकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. >असे आहे गोपाळपुरचे मंदिर... गोपाळपुरातील गोपाळकृष्ण मंदिराचे आवार मोठे, प्रशस्त असून भोवती दगडी तटबंदी आहे. सभोवार ओवऱ्या आहेत. येथील पाषाण ५०० वर्षांपूर्वीचे असावेत, असा मूर्तीशास्त्र संशोधकांचा अंदाज आहे. या मंदिराला तीन दरवाजे आहेत. मंदिरात ४२ खोल्या आहेत. मुख्य दरवाजा उंच, भव्य आकर्षक आहे. येथील व्यवस्था गुरव समाजाचे लोक पाहतात. मंदिरातील शिलालेखाचे आधारे इ. च्या १७४४ साली हे कृष्ण मंदिर तळेगावाचे अनंत श्यामजी दाभाडे यांनी बांधले आहे. जनाबाईचा संसार पाहण्यासाठी गर्दीगोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील गोपाळकृष्ण मंदिरातील जनाबाईचा संसार पाहण्यासाठी व दळणाचे जाते फिरवण्यासाठी महिला भाविकांनी गर्दी केली होती. मंदिर परिसरात महिला व पुरुष फुगडी खेळत होते. त्याचबरोबर, मंदिराला प्रदक्षिणा मारून माघारी जात होते.