मुंबई-ठाण्यात दहीहंडी उत्साहात : पण नियम पायदळी, सर्रास चढले बाळगोपाळ, ध्वनिप्रदूषणाचा कहर
मुंबई/ठाणो : ‘बोल बजरंग बली की जय ..’, ‘ तुङया घरात नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा..’ अशा आरोळ्या देत सळसळत्या तरुणाईच्या जल्लोषात दहीहंडी उत्सव सोमवारी पार पडला. मुंबई, ठाण्यासह उपनगरांतील अनेक गल्ल्या, नाके गोविंदांनी फुलून गेले होते. ढाक्कुमाक्कुमचा ठेका धरीत डीजेच्या दणदणाटाने सारे वातावरण भारले गेले होते. शहरातील काही मोठय़ा आयोजकांमध्ये हिंदी-मराठी सिनेसृष्टीतील सेलीब्रिटींनी हजेरी लावून गोविंदांचा उत्साह दुणावला. डीजेच्या तालावर थिरकताना आणि उंच थर चढवताना मात्र सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्देश गोविंदा पथक आणि आयोजक सर्रास पायदळी तुडवताना दिसले. त्यामुळेच दिवसभरात ठाणो, मुंबईत 297 हून अधिक गोविंदा जखमी झाले. ठाण्यात डीजेच्या तालावर थिरकताना एका गोविंदाचा हृदयविकाराने मृत्यू झाला.
12 वर्षाखालील बालगोविंदांचा समावेश थरांमध्ये करणार नाही, असा निर्णय दहीहंडी समन्वय समितीने जाहीर करूनही मुंबई-ठाण्यातील दहीहंडी उत्सवात बालगोविंदाच सरस ठरले. सर्वोच्च न्यायालयाचे नियम धाब्यावर बसवून गोविंदा पथकांनी बेधडकपणो बालगोविंदांनाच सातव्या आणि आठव्या थरावर चढवत त्याच जल्लोषात उत्सव साजरा केला. न्यायालयाने आवाजाची मर्यादा निश्चित केलेली असताना कोणत्याही आयोजकाकडून या नियमाचे पालन केले गेले नाही. उत्सवाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असूनही कारवाईबाबत मात्र ढिम्मपणाच दिसून आला. त्यामुळे आता या गोविंदा पथकांवर कारवाई होणार का, याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.
हृदयविकाराने ्रगोविंदाचा मृत्यू
ठाण्यात नृत्य करताना राजेंद्र आंबेकर (46) या गोविंदाचा हृदयविकाराने मृत्यू झाला़ राजेंद्र हे लालबागच्या गणोशनगरचे रहिवासी असून, ते साई सदन गोविंदा पथकाचे सदस्य आहेत.
बालगोविंदा; मुंबईत गुन्हा
कोर्टाच्या आदेशाचे उल्लघंन करुन दहीहंडीत 1क् वर्षाच्या मुलाला सहभागी केल्याप्रकरणी जोगेश्वरीतील ओम साई राम गणोश गोविंदा पथकाचा आयोजक चेतन खेतले याला पोलिसांनी रात्री अटक केली.
09 थरांचा ठाण्यात विक्रम
ठाण्यातील संघर्षच्या दहीहंडी उत्सवात जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने 9 थर लावून सलामी दिली. नवथरांचा हा थरार पाहणारे आणि त्यांना सावरण्यासाठी सरसावलेले गोविंदा.