शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शेळके खून प्रकरण; २० जणांवर मोक्का

By admin | Updated: November 7, 2016 01:00 IST

माजी नगराध्यक्ष सचिन शेळके खूनप्रकरणी २० आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कलम १९९९ (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.

तळेगाव दाभाडे : माजी नगराध्यक्ष सचिन शेळके खूनप्रकरणी २० आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कलम १९९९ (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.पूर्ववैमनस्याच्या कारणावरून श्याम दाभाडे व त्याच्या साथीदारांनी १६ आॅक्टोबरला सचिन शेळके यांची गोळ्या घालून व धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृण हत्या केली.शेळके खून प्रकरणातील २० पैकी १० आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत, तर तीन आरोपी पोलीस कोठडी भोगत आहेत. सात आरोपी फरारी असून, पोलीस त्यांचा कसूून शोध घेत आहेत. रुपेश सहादू घारे (वय २५, रा. महागाव, ता. मावळ), राजेश दादाभाऊ ढवळे (वय ३०, रा. रुपीनगर, तळवडे), शिवाजी भरत आढाव (वय २४), अमित अनिल दाभाडे (वय २३, दोघेही रा. कालेकॉलनी, पवनानगर, ता. मावळ) , सचिन लक्ष्मण ठाकर (वय २६, रा. ठाकूरसाई, ता. मावळ) या पाच आरोपींची पोलीस कोठडीची मुदत रविवारी संपल्याने त्यांना वडगाव न्यायालयापुढे हजर केले असता, या पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश वडगाव न्यायालयाने दिले आहेत. बंटी ऊर्फ शंकर रामचंद्र दाभाडे (वय ३५, रा. कोटेश्वरवाडी, ता. मावळ), संदीप सोपान पचपिंड(वय ३०. रा. आंबी, ता. मावळ),खंडू ऊर्फ पप्पू दत्तात्रय पचपिंड ( वय ३०, रा. माळवाडी, ता. मावळ), आकाश दीपक लोखंडे (वय २१, रा. जोशीवाडा, तळेगाव स्टेशन, ता. मावळ), दत्तात्रय ज्ञानेश्वर वाघोले (वय २८ रा. ठाकरवाडी, इंदोरी) यांची यापूर्वीच न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पिंट्या ऊर्फ बाळू दत्तात्रय सांडभोर (वय ३३ रा. कोटेश्वरवाडी, ता. मावळ), सूरज विलास गायकवाड (वय २२, रा. ठाकरवाडी, इंदोरी), नितीन शिवाजी वाडेकर (वय २२, रा. भांबोली, ता. खेड) या तीन आरोपींची पोलीस कोठडी ८ नोव्हेंबरपर्यंत आहे. शेळके खून प्रकरणातील श्याम रामचंद्र दाभाडे (रा. कोटेश्वरवाडी ,ता. मावळ), धनंजय प्रकाश शिंदे ऊर्फ तांबोळी (रा. वारंगवाडी, ता. मावळ), देवानंद ऊर्फ देविदास विश्वनाथ खर्डे (रा. यशवंतनगर, तळेगाव स्टेशन), अजय राजाराम हिंगे (रा. पिंपळखुटे, ता. मावळ) व इतर आरोपी अद्याप फरारी आहेत. वरील २० जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत बाबर दिली. (वार्ताहर)