शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गुगल देणार मराठीला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 03:35 IST

मराठी साहित्याची वाढती मागणी लक्षात घेऊन ‘गुगल’ने मराठी साहित्यिक आणि लेखकांसाठी इंटरनेटच्या माध्यमातून एका अभिनव उपक्रमाची आखणी केली आहे.

पुणे : मराठी साहित्याची वाढती मागणी लक्षात घेऊन ‘गुगल’ने मराठी साहित्यिक आणि लेखकांसाठी इंटरनेटच्या माध्यमातून एका अभिनव उपक्रमाची आखणी केली आहे. इंटरनेटमार्फत आपले साहित्य आणि पुस्तके पोहोचवू पाहणाऱ्या लेखक आणि प्रकाशकांना गुगलतर्फे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी ‘गुगल सर्च संमेलन’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार असून, त्याचा पहिला टप्पा म्हणून येत्या २२ जून रोजी गुगलतर्फे पुण्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठीसाठी आवश्यक गुगलच्या विविध फीचर्ससंदर्भात या कार्यशाळेत माहिती दिली जाईल.या कार्यशाळेसाठी नावनोंदणी सुरू झाली असून, नोंदणीत दिलेल्या माहितीच्या आधारे कार्यशाळेत सहभागी होणाºया सदस्यांची निवड गुगलच्या टीमकडून केली जाणार आहे. ँ३३स्र२://ॅङ्मङ्म.ॅ’/ऋ२ु९४४ या लिंकवर कार्यशाळेचा नोंदणी अर्ज उपलब्ध करण्यात आला आहे. निवड झालेल्या सदस्यांना ई-मेलद्वारे कार्यशाळेची माहिती कळवली जाईल.‘गुगल सर्च संमेलन’ या उपक्रमांतर्गत हिंदीसह मराठी, तमीळ, तेलुगू आणि बंगाली या चार प्रादेशिक भाषांमधील लेखक, प्रकाशक, ब्लॉग लेखक, प्रादेशिक भाषांत वेबसाइटची निर्मिती करणारे डेव्हलपर; तसेच मराठीशी संबंधित व्यावसायिक यांच्याशी गुगल संवाद साधणार आहे. गुगलने उपलब्ध केलेल्या फीचर्सचा वापर कसा करावा, याबाबतसुद्धा मार्गदर्शन करण्यात येईल. मराठी भाषेमधील साहित्य इंटरनेटवरील वाचकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवायला हवे, यासाठी ‘गुगल’तर्फे सहकार्य करण्यात येणार आहे.

टॅग्स :marathiमराठीgoogleगुगलnewsबातम्या