शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शुभवार्ता - गृहरक्षकांसाठीची १२ वर्षेच सेवेची अट शिथिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 06:37 IST

सण व उत्सवाच्या वेळी बंदोबस्तामध्ये पोलिसांच्या बरोबरीने राबत असलेल्या गृहरक्षकांसाठी (होमगार्ड) एक शुभवार्ता आहे. १२ वर्षांपर्यंतच त्यांची सेवा घेण्याच्या अटीला राज्य सरकारने तात्पुरती स्थगित दिली आहे.

जमीर काझी मुंबई : सण व उत्सवाच्या वेळी बंदोबस्तामध्ये पोलिसांच्या बरोबरीने राबत असलेल्या गृहरक्षकांसाठी (होमगार्ड) एक शुभवार्ता आहे. १२ वर्षांपर्यंतच त्यांची सेवा घेण्याच्या अटीला राज्य सरकारने तात्पुरती स्थगित दिली आहे. त्यामुळे जास्त वय असलेल्या अनेक होमगार्ड्सचा पुन्हा सेवेत रूजू होता येणार आहे. याबाबतचे आदेश गृहविभागाने मंगळवारी राज्यातील जिल्हा समादेशकांना दिले आहेत.तरुण, सशक्त व गरजू उमेदवारांना संधी मिळावी, म्हणून होमगार्डच्या एका जवानाला जास्तीत जास्त बारा वर्षेच काम देण्याचा निर्णय २०१०मध्ये होमागार्ड विभागाने घेतला होता. त्याचे पुनरावलोकन राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे. मात्र, प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही अट तात्पुरती शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा समादेशकांनी जुन्या उमेदवारांची वैद्यकीय व शारीरिक क्षमतेबाबत तपासणी करून, त्यांची जिल्हा होमगार्ड संघटनेकडे नोंदणी करावी, असे आदेश गृहविभागाने दिले आहेत.

...अन् अपर अधीक्षक चक्रावलेराज्यात होमगार्डचे जिल्हा समादेशक पदाची जबाबदारी, संबंधित जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अपर पोलीस अधीक्षकांकडे आहे. आता त्यांनी १२ वर्षांहून अधिक सेवा झालेल्या होमगार्डना पुन्हा नियुक्ती देण्याबाबत कार्यवाही करावयाची आहे. मात्र, त्याबाबतचे निकष, होमगार्डच्या शारीरिक क्षमतेची निवड व भरती याबाबत प्रक्रिया कशी घ्यावयाची, याबाबत काहीच कळविण्यात न आल्याने अपर अधीक्षक चक्रावून गेले आहेत.राज्यात होमगार्डची पुरुष व महिला उमेदवारांची संख्या ३० हजारांवर आहे. १२ वर्षांपर्यंत कार्यकाळाची मुदत निश्चित केल्यानंतर जवानांची कमतरता पडू नये, यासाठी गेल्या तीन वर्षांत ५ हजारांवर जवानांची निवड करण्यात आली आहे. आता जुन्या उमेदवारांना पुन्हा संधी द्यावयाची असल्याने, होमगार्डच्या संख्येत वाढ होणार आहे.