शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

#GoodBye2017: ‘थर्टी फर्स्ट’साठी आजपासूनच आउट, समुद्रकिना-यांना अधिक पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 03:32 IST

ठाणे : थर्टी फर्स्ट आणि रविवार असा सॉलिड योगायोग जुळून आल्याने ठाणेकरांचा सेलिब्रेशनचा मूड फेसाळून ऊतू जाऊ लागला असून बहुतांश ठाणेकरांनी पार्टीसाठी निसर्गरम्य पर्यटनस्थळे, किनारपट्टी याला पसंती दिली आहे.

ठाणे : थर्टी फर्स्ट आणि रविवार असा सॉलिड योगायोग जुळून आल्याने ठाणेकरांचा सेलिब्रेशनचा मूड फेसाळून ऊतू जाऊ लागला असून बहुतांश ठाणेकरांनी पार्टीसाठी निसर्गरम्य पर्यटनस्थळे, किनारपट्टी याला पसंती दिली आहे. वसई, पालघर, डहाणू, लवासा, अलिबाग, गोवा, केरळ अथवा कर्नाटक येथे ठाणेकर निघाले आहेत. त्यामुळे एक ठाणेकर दुस-याला ‘लेट्स डू पार्टी आउट आॅफ टाउन’ असेच सध्या म्हणत आहे.सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी ठाणेकरांनी महिनाभर आधीच प्लानिंग केल्याने आता ते सेलिब्रेशनसाठी सज्ज झाले आहेत. रविवारी सेलिब्रेशन करण्याकरिता शुक्रवार, शनिवारीच ठाणेकर निघणार आहेत. काहींनी कुटुंबासमवेत, तर काही जणांनी मित्रमैत्रिणींसोबत सेलिब्रेशनचे प्लान ठरवले असल्याने सध्या ठाणेकरांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर तीच चर्चा रंगली आहे. कोण, कधी, केव्हा, कुठून निघणार आणि कुणाला पिक करणार, याचे प्लान्स सुरू आहेत. गोवा, केरळ अथवा कर्नाटकला जाणारे ग्रुप हे एकतर स्वत:ची वाहने घेऊन किंवा ट्रेन अथवा फ्लाइटने तेथे पोहोचणार आहेत. मात्र, ज्यांना दूरवर जाऊन पार्टी करणे अशक्य आहे, त्यांनी जवळच्या निसर्गरम्य परिसरात रिसॉर्ट, बंगलो, हॉटेल्सपासून अगदी घरापर्यंतचे बुकिंग केले आहे. समुद्रकिना-याला अनेकांनी पसंती दिली आहे. त्याखालोखाल हिरवागार डोंगर किंवा घनदाट जंगलात पार्टी करण्यास ठाणेकरांची पसंती आहे. त्यामुळे काही ठाणेकरांचे ग्रुप शनिवारी रात्री अथवा सकाळी ट्रेकिंग करून जवळच्या एखाद्या डोंगरमाथ्यावर पोहोचतील व तेथेच नववर्षाचे स्वागत करतील. घनदाट जंगलातील बंगलो किंवा रिसॉर्ट येथे जाण्याकडेही कल आहे. मात्र, अनेक ठाणेकरांना नववर्षाचे स्वागत करताना आपल्या मोबाइलला रेंज असावी व व्हॉट्सअ‍ॅपवर होणाºया नववर्ष स्वागताच्या जल्लोषात सहभागी होता यावे, असे वाटते.रविवार, ३१ डिसेंबर हा सुटीचा दिवस आहे. शनिवारी अनेकांना सुटी आहे किंवा कार्यालयातील सुटीचा माहोल पाहून अनेकांनी सुटी टाकली आहे. ज्यांना शनिवारी दांडी मारणे अशक्य आहे, अशा काहींनी १ जानेवारीला सुटी टाकली आहे, तर काहींनी लेट येणार असल्याची पूर्वसूचना दिली आहे. पालघर, अलिबाग, डहाणू येथील किनारपट्टी परिसरात असणाºया रिसॉर्ट, बंगलो, हॉटेल्स १५ दिवस आधीच फुल्ल आहेत. त्यांचे दर हे तिप्पट किंवा पाचपट वाढले आहेत. महाबळेश्वर, माथेरान येथेही बुकिंग फुल्ल आहे. अनेक ठाणेकरांनी कर्जत, नेरळ, आसनगाव, बदलापूर वगैरे ठिकाणी सेकंड होम खरेदी केली आहेत. ते आपले कुटुंबीय अथवा मित्रमैत्रिणी यांना घेऊन तेथे जाणार आहेत.>पार्टी, हॉटेल शो यांचेही बुकिंग फुल्लज्यांना ठाणे सोडून बाहेर जाणे शक्य झालेले नाही, त्यांनी येथील हॉटेलमध्ये टेबल बुक केली आहेत. तेथील दर चौपट वाढलेले आहेत. पंजाबी, चायनीज, इटालियन फूडच्या शौकिनांनी त्यांच्या पसंतीच्या डेलिकसीज पार्टीत उपलब्ध होतील, याची खातरजमा करून घेतली आहे. शिवाय हॉटेलांत टेबल बुक करताना तेथे कोणते मनोरंजन उपलब्ध आहे, त्याचीही खात्री ग्रूपकडून करून घेतली जात आहे. सुट्या असल्याने शनिवारी रात्रीच निघणार आहोत, असे प्राजक्ता म्हात्रे हिने सांगितले. शहरात सेलिब्रेशनसाठी नवे काही नसल्याने यंदा कर्नाटकला हम्पी येथे जाणार असल्याचे देवेशू ठाणेकर याने सांगितले. यंदा समुद्रकिनारी थर्टी फर्स्टसाठी अलिबागला जाणार आहोत, अशी माहिती केतन इसामे याने दिली. ठाणेकर यंदाही महाबळेश्वर चुकवणार नाहीत, अशी अपेक्षा हॉटेलमालक अमित भोसले यांनी व्यक्त केली.>ठाण्यातील घोडबंदर रोड व तत्सम उच्चभ्रू लोकवस्तीमधील काही मंडळींनी वांद्रे, जुहू, वर्सोवा येथील पंचतारांकित हॉटेलांमध्ये होणा-या बड्या पार्ट्यांचे बुकिंग केले आहे किंवा एण्ट्री पास मिळवले आहेत. त्यामुळे ही मंडळी रविवारी सायंकाळीच ट्रॅफिक जॅममध्ये न अडकता तेथे पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत.