शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही चार नाही तर आठ मुलं जन्माला घाला, आम्हाला..."; असदुद्दीन ओवेसींचे अमरावतीत नवनीत राणांना प्रत्यूत्तर
2
"अभिषेक असता तर भाजपची हिम्मत झाली नसती"; दहिसरमध्ये ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, "तेजस्वीसोबत भांडण नाही"
3
पुणे: मढेघाटात ट्रेकिंगला गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांचा तुफान हल्ला; ३५ हून अधिक जण जखमी, स्थानिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला!
4
इराणमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, सर्वोच्च नेते खोमेनी रशियाला पळून जाण्याचा तयारीत
5
Narayan Rane : 'मी एका उपशाखा प्रमुखाला ठार मारणार होतो, बाळासाहेब ठाकरेंनी मला समजावलं म्हणून...'; नारायण राणेंनी सांगितला किस्सा
6
ट्रंप यांनी जाहीर केली सरकारी मदत घेणाऱ्या देशांची लिस्ट; त्यात भारताचे तीन शेजारी, भारताचे नाव आहे का?
7
परेश रावल यांचं मराठी रंगभूमीवरील प्रेम पुन्हा दिसलं, प्रेक्षकांमध्ये बसून पाहिलं 'हे' नाटक
8
सुरक्षित गुंतवणुकीचा 'सुपर' पर्याय! पोस्टाच्या NSC मध्ये २.५० लाखांवर मिळवा १.१६ लाखांचे फिक्स व्याज
9
खळबळजनक! नायजेरियात २२ भारतीय खलाशांना बेड्या; मालवाहू जहाजावर कोकेन सापडले...
10
धक्कादायक! अमेरिकेत भारतीय तरुणीचा खून करून प्रियकर भारतात पसार; पोलिसांना भेटून आला...
11
वंदे भारत एक्सप्रेस रुळावरून घसरण्याचा कट! रुळांवर लाकूड ठेवल्याचे आढळले; मोठा अपघात टळला
12
"मला खुश करणं गरजेचं, अन्यथा..."; रशियन तेलावरून डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला पुन्हा टॅरिफचा इशारा
13
बँक कर्मचारी संपावर जाणार, तीन दिवस व्यवहार होणार ठप्प; कधी, कुठे अन् कसा परिणाम होईल?
14
धक्कादायक! ट्रंप यांची व्हेनेझुएलावर दुसऱ्या हल्ल्याची धमकी; आता कोलंबियाही रडारवर, दक्षिण अमेरिकेत युद्धाचे ढग?
15
भाजपविरोधात १०१, तर शिंदेसेनेच्या विरोधात ८३ ठिकाणी मनसे लढणार; मराठी मते कोणाला मिळणार?
16
आजचे राशीभविष्य ५ जानेवारी २०२६ :आज ग्रहांची चाल 'या' राशींसाठी ठरणार फलदायी; पाहा तुमचे राशीभविष्य!
17
‘बिनविरोध’ निवडीवरून राज्यात राजकीय रणकंदन; मुख्यमंत्री फडणवीस यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर
18
मुंबईत १० रुपयांत जेवण, ठाकरेंचा शब्द; महापालिका निवडणुकीसाठी वचननामा
19
“हिंदू आहोत, हिंदी नाही, इथल्या प्रत्येक शहरातील महापौर मराठीच होणार”: राज ठाकरे
20
“विधानसभा अध्यक्षांना निलंबित करावे”; पदाचा दुरुपयोग केल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 20:09 IST

कोरोनामुळेच शिक्षकांनी बदल्यांची घेतली होती धास्ती

ठळक मुद्देप्रशासकीय बदल्या रद्द करण्याची प्राथमिक शिक्षकांची केली होती मागणी

बारामती :शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या अखेर रद्द करण्यात आल्या आहेत.याबाबत राज्य शासनाने निर्णय घेतल्याने शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे बदल्या होणार नाहीत,असे शिक्षकांना वाटत असतानाच शासनाने बदल्या करण्यास सांगितले होते. कोरोनामुळेच शिक्षकांनी या बदल्यांची धास्ती घेतली होती. मात्र,  शिक्षक संघाच्या मागणीस यश आले आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या निर्णयात बदल केला आहे. यावर्षी फक्त विनंती बदलीचे आदेश दिले आहेत.

शासनाने दिलेल्या आदेशानुसार तसेच तालुकाबाह्य प्रशासकीय बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाल्याची माहिती प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली. जुन्या शासन निर्णयामुळे तालुकाबाह्य प्रशासकीय बदलीच्या भीतीने राज्यभरातील शिक्षक हवालदिल झाले होते. विस्थापित शिक्षकांची विनाअट बदली करावी व प्रशासकीय बदल्या रद्द कराव्यात ही प्राथमिक शिक्षक संघाची मागणी होती,राज्य सरकारकडून निर्णय होण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाने शरद पवार यांची भेट घेतली होती. सोयीच्या बदल्यांसाठी पवार यांनी ग्रामविकासमंत्री यांना सूचना दिल्या होत्या. पवारांच्या सूचनेनुसार ग्रामविकासमंत्री यांनी प्राथमिक शिक्षक संघ सोबत कोल्हापूर येथे बैठक घेऊन याबैठकीत विनंती बदल्या करण्याची मागणी करण्यात आली होती.दरम्यान, आमदार रोहित पवार याप्रकरणी मंगळवार(दि ४) पासुन मुंबई येथे थांबुन होते. त्यांनी मुुंबईत थांबुन स्वता लक्ष घातले.त्यानंतरग्रामविकास विभागाला जिल्हाअंतर्गत प्रशासकीय बदल्या करताना गर्दी होवुन कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती लक्षात आली.

...विनंती बदल्या करण्याचे आदेश राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने याबाबत आज शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. कोरोना आजारामुळे सामाजिक आंतर पाळून फक्त विनंती बदल्या करण्याचे सर्व जिल्हा परिषदांना कळवले असल्याची माहिती सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली.—————————————————... रिक्त जागा वाढवाराज्य सरकारच्या निदेर्शानुसार सोयीच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषदांनी पुढाकार घ्यावा, आंतरजिल्हा बदलीने येणाºया शिक्षकांच्या प्रमाणात समानीकरणाची पदे विनंती बदलीसाठी खुली करावीत अशी शिक्षक संघाने जिल्हा परिषदेकडे मागणी केल्याची माहिती बाळासाहेब मारणे यांनी दिली .—————————————————

 विस्थापितांसाठी पुढील लढा गैरसोयीच्या बदल्या थांबविण्यासाठी शिक्षक संघास यश मिळाले विस्थापित शिक्षकांना विनाअट सोयीच्या बदल्यांसाठी पुढील काळात सरकारकडे पाठपुरावा सुरूच राहील.संभाजीराव थोरातराज्य नेते, प्राथमिक शिक्षक संघ—————————————————

टॅग्स :BaramatiबारामतीTeacherशिक्षकTransferबदलीState Governmentराज्य सरकार