शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

Good News: राज्यात पेट्रोल, डिझेल होणार स्वस्त

By admin | Updated: July 11, 2017 23:16 IST

राज्यातील सर्वसामान्यांसाठी खुशखबर आहे. राज्यात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 11 - राज्यातील सर्वसामान्यांसाठी खुशखबर आहे. राज्यात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार आहे. पेट्रोल प्रतिलिटर 67 पैसे आणि डिझेल प्रतिलिटर 1 रुपये 25 पैशांनी स्वस्त होणार आहे.

पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकारने लावलेला सरचार्ज रद्द करण्यात आल्याने राज्यात पेट्रोल प्रतिलिटर ६७ पैसे आणि डिझेल प्रतिलिटर १ रुपये २५ पैशांनी स्वस्त झाले आहे.
 
जीएसटी लागू झाल्यानंतरही तेलकंपन्यांकडून एसएससी आकारला जात होता. याबाबत फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी ग्राहक संरक्षक खात्याकडे तक्रार केली. त्यानंतर इंधनावर पेट्रोलियम कंपन्यांनी लावलेला स्टेट स्पेसिफिक सरचार्ज रद्द करावी, अशी मागणी अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली होती. धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर गिरीश बापट यांची मागणी मान्य करत एसएससी रद्द करण्यात आला आहे. गिरीश बापट यांनी 7 जुलैरोजी पुण्यात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची पुण्यात भेट घेतली होती.  या भेटीत बापट यांनी सरचार्ज रद्द करण्याची मागणी केली होती. सरचार्ज रद्द झाल्यास पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात होईल. त्यामुळे केंद्र सरकारने जनतेला जीएसटीमुळे होणारा फायदा दिलाच पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. अकेर त्यांची मागणी मान्य करण्यात आली. त्यामुळे पेट्रोल 67 पैसे, डिझेल 1 रुपया 24 पैशांनी तर गॅस सिलेंडर 11 रुपयांनी स्वस्त होणार आहे. 
 
राज्यात मुंबईत तेल कंपन्यांच्या दोन रिफायनरी आहेत. या रिफायनरीमध्ये आयात होणाऱ्या कच्च्या तेलावर मुंबई महापालिका जकात आकारत होती. या जकातीतून महापालिकेला सुमारे ३ हजार कोटी मिळत होते. याचा भार ग्राहकांच्या खिशावरच पडत होता. तेल कंपन्या पेट्रोल, डिझेल आणि अन्य पेट्रोलियम पदार्थांवर राज्य विशेष कर (स्टेट स्पेसिफीक सरचार्ज) लावत होत्या. मात्र जीएसटी लागू झाल्याने मुंबईतील कच्च्या तेलावरील जकातही मुंबई महानगरपालिकेने थांबवली होती. मात्र त्यानंतरही तेल कंपन्या विशेष सरचार्ज रद्द न करता त्याची वसुली करत असल्याचे समोर आले होते.